बीडमध्ये शरद पवारांनी दिली तरुण रक्ताला संधी - Sharad Pawar gives chance to young generation | Politics Marathi News - Sarkarnama

बीडमध्ये शरद पवारांनी दिली तरुण रक्ताला संधी

सरकारनामा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पक्षाचे पाचही उमेदवार जाहीर केले आहेत.

उमेदवारी जाहीर करताना शरद पवार यांनी तरुण रक्ताला प्राधान्य दिले आहे.

परळीत अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे परळीत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे हा बहीण - भावातील संघर्ष पाहावयास मिळणार आहे . 

Image result for prakash solanke

माजलगावमधून माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना संधी देण्यात आली आहे.माजलगावात भाजप उमेदवार बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष्य राहील . 

Image result for sandip kshirsagar

बीड शहरात जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बीडमध्ये आता काका पुतण्यातील महासंग्राम आता पाहावयास मिळेल . 

Image result for Vijaysinh panditImage result for namita mundada

गेवराईत विजयसिंह पंडित यांचे नाव जाहीर करण्यात आले तर केजमध्ये कै. विमल मुंदडा यांच्या स्नुषा नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे.

शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर या यंग ब्रिगेडला प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख