आम्ही रोजगार दिले तुम्ही बेरोजगारी वाढवली , पवारांचा अमित शहांना टोला 

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. आपल्या गुजरात राज्यातील कोणी असावे म्हणून अमित शहांना संधी मिळालीअसे शरद पवार म्हणाले.
sharad_pawar_amit_shah
sharad_pawar_amit_shah

बीड : सर्वप्रथम रोजगार हमी कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो असे सांगून शरद पवारांनी आपण  केलेल्या विविध कामांची यादीच जनतेसमोर मांडली .  मी काय केले असे विचारणाऱ्या अमित शहांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत नव्हते, आपल्यापैकी कोणाला ते माहित होते का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थितांना केला.

महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी काय केले असे अमित शहा म्हणाले होते. त्यावर गेवराईत शनिवारी झालेल्या सभेत शरद पवार यांनी कामांची यादीच सादर करुन शहांचा समाचार घेतला. रोजगार हमी योजनेच्या कायद्यासह मंडल आयोग, ओबीसींना सत्तेत वाटा असे अनेक कायदे केले, आम्ही जागोजागी कारखाने उभारुन रोजगार दिले आणि तुम्ही बंद करुन बेरोजगारी वाढवित आहात.

पाच वर्षांपूर्वी कोणालाही माहित नसलेले अमित शहा विचारतात मी काय केले असे विचारत आहेत असे शरद पवार म्हणाले. कलम ३७० ला विरोध नव्हता असे सांगत त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग असा सवाल करुन भाजप मात्र याचा निवडणुकीसाठी वापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.  

मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. कोणासोबत कुस्ती खेळायची, कशी खेळायची, कोणाला संधी द्यायची, कोणाला बाजूला सारायचे हे मला माहित आहे. असल्यांसोबत कुस्ती खेळत असतेत का, असे विशिष्ट पद्धतीने हातवारे करुन शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.

आमचा पैलवाल तेल लाऊन तयार आहे, परंतु समोर विरोधक दिसत नाहीत या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. विरोधात कोणी दिसत नाही तर मग मोदींच्या नऊ, शहांच्या २० सभा आणि मुख्यमंत्री गावोगावी जाऊन मतांचा जोगवा का, मागत आहेत असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे गेवराईचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ शनिवारी सभेत श्री. पवार बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव पंडित, उमेदवार विजयसिंह पंडित, उषा दराडे, सय्यद सलिम, अमरसिंह पंडित, सुनिल धांडे, महेबुब शेख, कल्याण आखाडे, सुभाष राऊत, बाबूराव पोटभरे, संदीप क्षीरसागर, दादासाहेब मुंडे आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com