शरद पवारांना बारामतीतील पराभवाची चाहुल लागली : गिरीश महाजन

शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाविषयी जे भाष्य केले आहे त्याचे मला आश्‍चर्य वाटते. त्यांना बारामती मतदारसंघातील पराभवाची चाहुल लागली असावी. त्या मानसिकतेतुन ते विधाने करीत आहेत असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
Girish Mahajan - Sharad Pawar
Girish Mahajan - Sharad Pawar

नाशिक : शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाविषयी जे भाष्य केले आहे त्याचे मला आश्‍चर्य वाटते. त्यांना बारामती मतदारसंघातील पराभवाची चाहुल लागली असावी. त्या मानसिकतेतुन ते विधाने करीत आहेत असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. 

महाजन आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी येथे आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या विधानाचा परामर्श घेतला. 'बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव झाल्यास मतदारांचा लोकशाही वरील विश्‍वास उडेल. कदाचीत निवडणूक यंत्रातील (इव्हीएम) गडबडीमुळेही तसे होऊ शकते,' असे विधान पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. ''पवार यांच्या या विधानाचे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्‍चर्य वाटते. ते राज्याचे, देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना राजकीय हवेचा फार लवकर अंदाज येतो. त्यामुळे बारामती मतदारसंघात आपला पराभव होणार याची त्यांना चाहुल लागली असावी. या पराभवाच्या मानसिकतेतुनच त्यांनी हे विधान केले असावे. मात्र त्यामुळे अप्रत्यक्षरित्या त्यांनी लोकशाही व्यवस्थेवर अविश्‍वास व्यक्त केला आहे.'' असे महाजन म्हणाले.

महाजन पुढे म्हणाले, ''कालच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी 'कदाचीत पवार साहेब देशाचे पंतप्रधान होऊ शकतात' असे विधान केले होते. आपले दोन- चार खासदार निवडून येत असतांना ते पंतप्रधान होण्याची अपेक्षा हे लोकशाही व्यवस्थेचे द्योतक आहे. दुसरीकडे 'इव्हीएम' वर अविश्‍वास व्यक्त करुन ते लोकशाहीवर अविश्‍वास देखील व्यक्त करतात. हा विरोधाभास वाटतो.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com