शरद पवार यांनीही मानले 'त्या' सर्वच सेवादात्यांचे आभार!

आज संपूर्ण देशभरात सायंकाळी ठीक पाच वाजता टाळ्या, थाळ्यांचा आवाज घुमला तो कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईत आपल्या निवासस्थानी बाहेर येऊन टाळ्या वाजवत या सर्व सेवादात्यांचेआभार मानले
Supriya Sule Sharad Pawar thanked Those who worked to Curb Corona
Supriya Sule Sharad Pawar thanked Those who worked to Curb Corona

पुणे : आज संपूर्ण देशभरात सायंकाळी ठीक पाच वाजता टाळ्या, थाळ्यांचा आवाज घुमला तो कोरोनाच्या काळात सेवा देणाऱ्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंबईत आपल्या निवासस्थानी बाहेर येऊन टाळ्या वाजवत या सर्व सेवादात्यांचे आभार मानले.

आज दिवसभर सकाळी सात पासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. सायंकाळी पाच वाजता सर्वांनी आपल्या घराच्या दारात उभे राहून, डाॅक्टर, नर्सेस, पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, माध्यमकर्मी आदींचे त्यांच्या कोरोनाच्या काळातल्या सेवेबद्दल कौतुक करावे, असे आवाहन मोदी यांनी केले होते. दुपारी ४ वाजून ५९ मिनिटांपर्यंत शांत असणारा देश पाच वाजता टाळ्या, थाळ्या आणि शिट्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. 

शरद पवार यांनीही आपल्या कुटुंबासहित निवासस्थानाबाहेर येत टाळ्या वाजवत सर्व सेवाकर्त्यांना अभिवादन केले. त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई, खासदार कन्या सौ. सुप्रियाताई सुळे, जावई सदानंद सुळे या सर्वांनीच टाळ्या वाजवत कोरोनाच्या काळात अहर्निश सेवा देणाऱ्यांना सलाम केला. पवार यांचे सुरक्षा रक्षकही यात सहभागी झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com