sharad pawar on fadanvis | Sarkarnama

`फडणवीसांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असल्याचे मला माहीत नव्हते'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या `मी पुन्हा येईन' या विधानाची आज नागपुरात चांगलीच खिल्ली उडवली. 

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या `मी पुन्हा येईन' या विधानाची आज नागपुरात चांगलीच खिल्ली उडवली. 

देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत बोलताना भाजपचेच सरकार येईल. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसनेचे खिचडी सरकार सहा महिनेही टिकू शकणार नाही, असे म्हटले होते. यावर पत्रकरांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारता ते म्हणाले, की `मी पुन्हा येणार.... मी पुन्हा येणार... मी पुन्हा येणार...' हेच माझ्या डोक्यात आहे. आता तर तुम्ही वेगळंच सांगताय. 

याच विषयावर पुढे बोलताना पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना मी जाणतो. मात्र, त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असल्याचे मला माहीत नव्हते.

नागपूरच्या पैलवानाला भेटलात का, या एका प्रश्नावरही त्यांनी फक्त स्मित हास्य केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख