संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलायला नको होते - शरद पवार

संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल बोलायला नको होते - शरद पवार

नाशिक : खासदार संजय राऊत यांच्या विधानापासून मी दूर आहे. राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी ते विधान करायला नको होते. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. श्री पवार नाशिक दौ-यावर आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते. 
राज्यमंत्री पाटील यांना कर्नाटकात गेल्यावर मारहाण झाली. पोलिसांनी दडपशाही केली याबद्दल विचारले असता ते म्हणाले, कर्नाटक पोलिसांचे हे कृत्य नवे नाही. मी आणि एस. एम. जोशी बेळगाव येथे गेलो होते. आम्हालाही पोलिसांनी मारहाण केली होती. अगदी पाठीवर वळ उमटले होते. अगदी छगन भुजबळांच्या वाट्यालाही हे आले आहे. आम्ही तर लवकर परतलो. मात्र भुजबळांवर कर्नाटक सरकारचे एवढे प्रेम की ते दोन महिने अडकून पडले होते. मात्र काही झाले तरी या प्रश्नावर आम्ही सीमा भागातील मराठी माणसांबरोबरच राहू. 

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या इंदिरा गांधी यांच्या विधानावरून वाद सुरू आहे. याबाबत आपल्याला काय वाटते ? यावर ते म्हणाले, त्यांच्या या वक्तव्यापासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होतो हे आमचं मत आहे. त्यांनी ते विधान आता मागे घेतलंय. त्यामुळे वादावर पडदा पडला पाहिजे, असे वाटते. श्री पवार म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. यातील सगळेच काही त्यांना माहिती नसतात. महंमदअली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असंही वादळ एकदा उठलं होतं. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत काय निर्णय झाला आहे ? यावर त्यांनी राष्ट्रवादीत परतण्यास तयार असणाऱ्यांविषयी पक्षातील प्रमुख पदाधिकारी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्याबाबत अद्याप ठरले नाही. ते पुढे म्हणाले, तीन पक्षांचं सरकार करतांना आम्ही काही निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालवायचं आहे. त्यामुळे घटक पक्षांत अस्वस्थता निर्माण होईल अशी वक्तव्ये करू नयेत अशी सुचना केली आहे. सगळे शहाणे आहेत. कॉंग्रेस व्यवहारी आहे. त्यामुळे त्यात काही अडचण येणार नाही. सरकार संबंधित काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण ठरवलं, शेतीची पुनर्बांधणी धोरण ठरवलं आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com