अजितदादांनी हा हक्क बजावला...मात्र शरद पवार आले नाहीत..

....
अजितदादांनी हा हक्क बजावला...मात्र शरद पवार आले नाहीत..

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी पाच गटांत प्राथमिक अंदाजानुसार 90 टक्केंपेक्षा अधिक मतदारांनी हक्क बजावला. ५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले.

`ब`वर्ग सभासद संस्था मतदार संघात शंभर टक्के टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. `ब`वर्ग सभासद संस्था मतदार संघात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतदान असल्याने ते सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान बारामती शहरातील मतदान केंद्रावर पोचले. परंतु माळेगाव गटामध्ये १०३० मतदान क्रमांकाने सभासद असलेले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे मात्र मतदान झाले नाही.

दरम्यान, `ब`वर्गमध्ये १०० मतदार आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीपुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलकडून स्वप्नील जगताप, तर सत्ताधारी गटाकडून चतुर्भुज जगन्नाथ मुळीक उभे होते. सांगवी, माळेगाव, नीरावागज गटात सकाळपासून सर्वाधिक मतदान करण्याचा जोर दिसून आला. माळेगावच्या पाचही गटांत पुरूषांबरोबर महिलांच्या रांगा मतदानासाठी लागल्याचे आशादायक चित्र दिसून आले. ग्रामीण भागाप्रमाणे बारामती शहरातील मतदारांमध्येही उत्साह चांगलाच होता. त्यामुळे बारामती, पणदरे, सांगवी, नीरावागज आणि माळेगाव या गटांत विक्रमी मतदान होईल, असे सांगण्यात आले. माळेगावच्या निवडणूकीत एकूण १३ हजार ७७२ मतदार आहेत, त्यापैकी १२ हजारांपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील असेच चित्र उत्साही वातावरणावरून दिसून येते.

विशेषतः मतदारांच्या टक्केवारीवरून बहुतेक सर्व गटांत चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, सत्ताधारी चंद्रराव तावरे, रंजन तावरे, संपतराव देवकाते या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याच्या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे. यंदाच्या निवडणूकीत मतदार राजा हा खूपच शांत होता. याचा अर्थ सत्ताधारी आणि विरोधकांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com