फडणवीस तुम्ही लहान आहात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका : शरद पवार

"देवेंद्र फडणवीस तुम्ही खुप लहान आहात. भान ठेवत चला. डोक्यात हवा जाऊ देऊ नका. भुजबळांवर तुम्ही आरोप करता. मात्र तुमच्या पक्षाचे अध्यक्षांवरसुध्दा कितीतरी प्रकरणात आरोप होते. जेलमध्ये होते. जामीनावर बाहेर आले होते हे विसरू नका,'' अशा शब्दांतराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना खडसावले.
फडणवीस तुम्ही लहान आहात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका : शरद पवार

नाशिक : "देवेंद्र फडणवीस तुम्ही खुप लहान आहात. भान ठेवत चला. डोक्यात हवा जाऊ देऊ नका. भुजबळांवर तुम्ही आरोप करता. मात्र तुमच्या पक्षाचे अध्यक्षांवरसुध्दा कितीतरी प्रकरणात आरोप होते. जेलमध्ये होते. जामीनावर बाहेर आले होते हे विसरू नका,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांना खडसावले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे उमेदवार समीर भुजबळ आणि धनराज महाले यांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे जाहीर सभा झाली. त्याला मोठी गर्दी होती. यावेळी पवार म्हणाले, ''फडणवीस सध्या काहीही बोलत सुटले आहेत. आमचे उमेदवार समीर भुजबळ जामीनावर आहेत असे बोलतात. मी कोणाच्याही व्यक्तीगत विषयात कधी लक्ष घालत नाही. मात्र, ते ज्या पक्षाचे आहेत. त्या पक्षाच्या अध्यक्षांवर किती आरोप आहेत. किती प्रकरणात त्यांच्यावर खटले होते. ते सुध्दा जेलमध्ये होते आणि जामीनावर बाहेर आलेले आहेत. हे विसरू नका. तुम्ही खुप लहान आहात. मिळालेल्या सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करायचा असतो. त्याचा तुम्हाला विसर पडला आहे.''

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश  छाजेड, आमदार निर्मला गावित, अॅड भगीरथ शिंदे, माजी खासदार देविदास पिंगळे, हंसराज वडघुले, रिपब्लिकनचे कटारे,  अपूर्व हिरे, प्रेरणा बलकवडे, श्रीराम शेटे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com