राहुरीच्या आमदारांना मतदारांनी धडा शिकवावा!

राहुरी येथे डॉ. बाबूरावदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची धोरणे ठरत. स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारा, राज्याचे नेतृत्व करणारा, असा नावलौकिक असलेल्या नगर जिल्ह्याची प्रतिष्ठा राहुरीच्या भाजप उमेदवारामुळे धुळीला मिळत आहे.
राहुरीच्या आमदारांना मतदारांनी धडा शिकवावा!

राहुरी (नगर) : " मुलींना मोक्का न लावण्यासाठी व कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्यासाठी आमदारकीची शक्ती खर्च करणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवावा. राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मूठमाती द्यावी. राहुरीतील उमेदवार प्राजक्त तनपुरे व श्रीरामपूरचे लहू कानडे यांना विजयी करावे,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारसभेत पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे, शिवसेनेचे गोविंद मोकाटे, धनराज गाडे, अरुण कडू, बाबासाहेब भिटे, मनीषा ओहोळ, निर्मला मालपाणी, प्रकाश देठे, सत्यवान पवार, शब्बीर देशमुख, अजित कदम, अमृत धुमाळ आदी उपस्थित होते.

"मुळा धरणासाठी राहुरीतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या. त्यामुळे राहुरीतील शेतकऱ्यांसाठी डाव्या कालव्याकरिता धरणातून पाण्याचे आरक्षण दिले. मागील वर्षी मुळा धरण 21 टीएमसी भरले, तरी एकच आवर्तन मिळाले. पाटपाण्याचे नियोजन झाले नाही. शेतीधंदा उद्‌ध्वस्त झाला. परिणामी, राहुरीतील दोन्ही साखर कारखाने यंदा बंद ठेवण्याची दुर्दैवी वेळ आली. निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे राहुरीचा विकास खुंटला. त्यामुळे या निवडणुकीत तरुणांच्या फळीचा शिलेदार, उच्चशिक्षित, अभ्यासू व विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार प्राजक्त तनपुरे व श्रीरामपूरचे लहू कानडे यांना विजयी करावे,'' असे आवाहन पवार यांनी केले.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात दौरा केला, तेव्हा दहा वर्षे भूलथापा देणाऱ्या आमदाराविरुद्ध जनतेत फक्त नाराजी नाही, तर उद्रेक पाहायला मिळत आहे. तालुक्‍यातील आरोग्यसेवेचा खेळखंडोबा करणारे, निळवंडे कालव्याचे, राहुरी पालिकेच्या पाणीयोजनेचे खोटे श्रेय घेऊ पाहणाऱ्या फोटोसम्राट आमदाराला मतदारांनी ओळखले आहे. पाटपाण्याचा संघर्ष करण्यासाठी, हक्काचे पाणी जिवंत ठेवण्यासाठी साथ द्यावी.''  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com