बबनरावांचे लक्ष कामात नव्हते, दुसरीकडेच होते!

राहुल जगताप शंभर टक्के निवडून येणारा उमेदवार असताना, कारखान्याचे पैसे थकले म्हणून उमेदवारी नाकारतो आणि आपण मात्र वर्षानुवर्षे थकलेले पैसे तसेच ठेवून उमेदवारी करता, याचा मतदार विचार करणार आहेत.
बबनरावांचे लक्ष कामात नव्हते, दुसरीकडेच होते!

श्रीगोंदे (नगर): "मतदारसंघाचे भले करण्यासाठी बबनराव पाचपुते यांना तेरा वर्षे मंत्री केले; पण त्यांचे लक्ष कामात नव्हते, तर दुसरीकडे होते. मंत्रिपदाच्या काळात काहीच करता आले नाही. मग त्यांनी बांगड्या भरायला पाहिजे होत्या,'' अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. 

"कारखान्यात घाम गाळणाऱ्या कामगारांना व ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना दाम देता आले नाही, हा तळतळाट बबनराव, तुम्हाला भोवणार आहे,'' असा थेट हल्लाही त्यांनी चढविला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्या श्रीगोंद्यातील प्रचारसभेत पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार दादा पाटील शेळके होते.

पवार म्हणाले, "शेतकऱ्यांची "एफआरपी'ची रक्कम थकली म्हणून आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी केली नाही; पण समोरच्या उमेदवाराने ऊसबिल थकविले, कामगारांचे पगार दिले नाहीत; मात्र ते मैदानात उतरले. मतदारसंघाच्या भल्यासाठी पाचपुते यांना तेरा वर्षे मंत्रिपद दिले. मात्र, त्यांना केवळ सह्यांचे अधिकार होते व ते बिनकामाचे मंत्री राहिले, असे ते सांगतात. मात्र, मंत्र्याने सही केली तरी तो आदेश होतो, हे त्यांना समजले नाही. यांना गृह खात्याचे राज्यमंत्री केले. सर्वांत महत्त्वाचे वन खाते यांच्या ताब्यात दिले. राज्य आणि केंद्राचा सर्वाधिक निधी असणारे आदिवासी खाते दिले, तरीही काहीच केले नाही, हे सांगणे पटत नाही. दोन खासगी कारखाने, भली मोठी हवेली, शेकडो एकर जमीन हे कशाचे प्रतीक आहे? कारखान्यात घाम गाळणाऱ्या कामगारांना व ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना दाम देता आले नाही, हा तळतळाट बबनराव, तुम्हाला भोवणार आहे! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com