Sharad Pawar Criticism on Government for using Air Force Name for Politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

हवाई दलाच्या शौर्याचा राजकीय वापर : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच रचला नाही, तर भूगोल तयार केला. त्यांनी कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही. हल्ली पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. असा वापर करणे भारतीय सैन्यासाठी चुकीचा होईल’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

यवतमाळ  : ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच रचला नाही, तर भूगोल तयार केला. त्यांनी कधीही सैन्याचा वापर राजकारणासाठी केला नाही. हल्ली पुलवामा व उरी या ठिकाणी सैन्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. असा वापर करणे भारतीय सैन्यासाठी चुकीचा होईल’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

येथील माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज गुरुवारी (ता.10) आयोजित पत्रकार परिषद पवार बोलत होते. भारतीय सैन्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. प्रत्येक भारतीयांना त्यांचा अभिमान आहे. पुलवामा व बालाकोट हल्ल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी सरकार व भारतीय सैन्य जी कारवाई करेल, त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र, कालांतराने भारतीय सैन्यांनी केलेल्या शौर्याचा वापर राजकारणासाठी करणे सुरू झाले, हे योग्य नाही, असे म्हणत पवार यांनी सत्ताधारी केंद्रीय नेतृत्वावर टीका केली. हे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने असे मुद्दे राजकारणात वापर करणे अत्यंत चुकीचे असल्याचेही पवार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख