शिवेंद्रसिंहराजे सोडून गेले तरी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार : शरद पवार

शिवेंद्रसिंहराजे सोडून गेले तरी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार : शरद पवार

सातारा :  आमदार शिवेंद्रसिंहराजे हे राष्ट्रवादी सोडुन गेले असले तरी आमच्याकडे साताऱ्यातून लढण्यासाठी तीन उमेदवार इच्छुक आहेत, त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी जिंकणारच, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी आज साताऱ्यात व्यक्त केला.

खासदार शरद पवार यांनी वाटेगावला जाण्यापूर्वी त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सत्ता नसताना ही कामे होऊ शकतात. पण सत्ताधाऱ्यांना तोंड देऊ शकत नाहीत म्हणून काहीजण गेले. तरीपण या वेळेस साताऱ्याची जागा आम्ही राखू.या जागेसाठी राष्ट्रवादीतून तीन अर्ज माझ्याकडे आले आहेत.

येथून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे स्पष्ट करून ते म्हणाले, उमेदवार कोण देता येईल या बाबत चर्चा सुरू असून राजघराण्यातील उमेदवार देता येईल का याबाबत अद्याप उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा झालेली नाही. उद्या ते मला भेटण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी आम्ही निश्चित काय ते ठरवू. 

इव्हीएम च्या अनुषंगाने विचारले असता, ते म्हणाले, आम्ही सर्व विरोधीपक्षीय नेते  निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलो होतो. आम्ही तक्रारी अर्जही दिला आहे. पण त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला नाही.

शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्यामुळे जिल्हापरिषद आणिजिल्हा बँकेच्या राजकारणावर काही फरक पडेल का, या प्रश्नावर त्यांनी याबाबत मला येथील नेमकी परिस्थिती माहीत नाही, त्यामुळे त्यांनी शेजारी बसलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराकडे बोट करून काही फरक पडेल का, असे विचारले, त्यावर सर्वांनी काहीही फरक पडणार नाही असे सांगितले.

शरद पवार आमच्या हृदयात आहेत असे भाजपचया व्यासपीठावर जाऊनही काही नेते म्हणतात, याबाबत विचारले असता, श्री. पवार म्हणाले, त्यांच्या हृदयाचा आकार मोठा झालाय का हे तपासावे लागेल. पण शेजारी बसलेल्या आमदारांचे काय यावर त्यांनी ते सर्व आमच्यासोबत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com