फडणवीसांबद्दल दिल्लीच्या भाजप वर्तुळात नाराजी: पवार

ते अजूनही ही भाषा करत असतील तर त्यांच्याविषयीची प्रतिक्रिया आणखी घट्ट होईल.
sharad pawar comment on mi punha yein
sharad pawar comment on mi punha yein

पुणे: देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा दर्प होता. त्यांनी मीपणाची भाषा केली, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांच्या या भाषेबद्दल दिल्लीतील भाजप वर्तुळातही नाराजी असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

राज्यातील सत्तास्थापनेच्यासंदर्भाने पवारांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे सातत्याने म्हणत होते, यासंबंधीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मी ते ऐकले आहे. शरद पवार इतिहासजमा झाले आहेत, असेही ते म्हणाले होते. लोकांच्या पाठिंब्याचा उपयोग संघटना बांधणीसाठी करायला हरकत नाही, मात्र त्यांनी त्याचा दर्प बाळगला. या सत्तेच्या दर्पातून मी म्हणजे सगळं, बाकी सगळे तुच्छ या भावनेनं ते वागत होते. पण लोकांना मीपणा आवडत नाही, विनम्रता आवडते. पाच वर्षापुर्वी फडणवीसांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान होतं? नागपूरचे महापौर असताना त्यांनी काही काम केले असेल. विधीमंडळात ते अॅक्टिव्ह सभासद होते. पण या पाच वर्षात 'मी म्हणजे महाराष्ट्र' असे ते वागत होते. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. ते अजूनही ही भाषा करत असतील तर त्यांच्याविषयीची प्रतिक्रिया आणखी घट्ट होईल. ही भाषा भाजपच्या दिल्लीतील लोकांनाही आवडत नाही. दिल्लीत मला भेटलेल्या भाजपच्या नेत्यांनी तशी मते व्यक्त केली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com