Sharad Pawar Comment on Jalgaon Roads | Sarkarnama

जळगाव औरंगाबाद रस्त्याने प्रवास डॉक्‍टर सोबत घेवूनच करावा : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

जळगाव औरंगाबाद महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही घेतली आहे.या मार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करायचा म्हणचे सोबत डाॅक्टरचीही व्यवस्था करावी लागते.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

चोपडा : जळगाव औरंगाबाद महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही घेतली आहे.या मार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करायचा म्हणचे सोबत डाॅक्टरचीही व्यवस्था करावी लागते.असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे उद्‌घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी,आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते

यावेळी महामार्गाच्या रस्त्याबाबत बोलतांना ते म्हणाले, जळगाव औरंगाबाद रस्ता एवढा खराब झाला आहे, की या मार्गाने खासगी वाहनाने जायचे असल्यास डॉक्‍टरची व्यवस्था करावीच लागते. सूतगिरणीबाबत बोलतांना ते म्हणाले. ''शेतकऱ्यांनी कष्टाने उभारलेल्या कारखाना हा शेतकऱ्यांनीच चालविला पाहिजे. तो भाडेतत्वावर देणे अयोग्य आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख