sharad pawar clears stand about article 370 | Sarkarnama

370 वे कलम रद्द करण्यास विरोध नव्हता : शरद पवार

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

उरुळी कांचन : जम्मू-काश्‍मीरसाठीचे 370 वे कलम रद्द करण्यास शरद पवार यांचा विरोध होता, असे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे कलम रद्द करण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही विरोध केला नव्हता. केवळ राज्यातील जनतेला विश्वासात घ्यावे, अशी माफक अपेक्षा सरकारकडून होती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीत मतदार भावनिक मुद्यांना फसले असले तरी, विधानसभा निवडणुकीत मात्र मतदार राज्यात शंभर टक्के बदल घडवतील, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदानात शुक्रवारी (ता. 11) जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे होते.

यावेळी उमेदवार ऍड. अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, देविदास भन्साळी, प्रा. के. डी. कांचन, प्रताप गायकवाड, माधव काळभोर, प्रकाश म्हस्के, माणिकराव गोते, राजाराम कांचन, सूर्यकांत गवळी, दिलीप वाल्हेकर, रवी काळे, सुजाता पवार, जितेंद्र बडेकर, कीर्ती कांचन, हेमलता बडेकर, युगंधर काळभोर, विकास लवांडे, राजेंद्र कांचन, देविदास कांचन, अमित कांचन, सागर कांचन, संतोष कांचन, लोचन शिवले, राजेंद्र चौधरी, अण्णा महाडीक, कांतिलाल काळे, सुभाष टिळेकर, अर्जुन कांचन, योगेश शितोळे, प्रदीप वसंत कंद उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडू लागले आहेत. कामगार व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. तरुणांच्या हातांना काम नसल्याने, नैराश्‍य वाढत आहे. शेतकरी, कामगार, उद्योजक अशा सर्वांना अडचणीत टाकणाऱ्या सरकारला खाली उतरवण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने लबाडाघरचे आवतण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरूर तालुक्‍यात आले असता यशवंत सहकारी साखर कारखाना शंभर दिवसांत चालू करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. पाच वर्षे उलटूनही, कारखाना चालू होऊ शकलेला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून तीन वर्षांचा कालावधी उलटलेला आहे. अभ्यास चालू असल्याचा नावाखाली तीन वर्षापासून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची आश्वासने म्हणजे लबाडा घरचे आवतण ठरल्याची टीका शरद पवार यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख