sharad pawar challenges chandrakant patil | Sarkarnama

अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांतदादांनी थेट निवडणूक लढावी : पवार 

सदानंद पाटील 
शनिवार, 28 जुलै 2018

कोल्हापूर: अपघाताने मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी जपून बोलावे. मी 14 निवडणूक लढल्या आहेत. यातील 7 निवडणुका थेट जनतेतून लढल्या आहेत. मंत्री पाटील यांनी अजून एकही निवडणूक जनतेतून लढलेली नाही. त्यांनी अगोदर 1 निवडणूक जनतेतून लढावी आणि मग माझ्यावर बोलावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी लावला. 

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा. पवार म्हणाले, काहीही वक्तव्य करणे, हे मंत्री पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेण्यासारखी नाहीत. हीच बाब मुखमंत्र्यांना लागू आहे. एक गोष्ट बरी आहे, येणाऱ्या काळात निवडणूक असून त्याचा आम्हाला फायदा होईल, असा टोलाही त्यांनी लावला. 

राज्यात मराठा समाजाचा उद्रेक सुरू आहे. या उद्रेकाच्या आगीत तेल ओतण्याचे काम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख