पवारांचे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन पूरग्रस्तांबरोबरच  

.
Sharad-Pawar-Rakhsha-bandhan
Sharad-Pawar-Rakhsha-bandhan

कोल्हापूर  :  राजर्षी शाहूंनी देशाला एकसंध राहण्याचा संदेश दिला आहे. आज महापूराचं संकट मोठं आहे आपण एकत्र त्याला  तोंड देऊ असा दिलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापूर येथे पुरग्रस्तांना दिला. ७३ वा स्वातंत्र्य दिन त्यांनी पूरग्रस्तांबरोबर साजरा केला.

महापुराचा मोठा फटका कोल्हापूर शहराला आणि आजूबाजूच्या अनेक गावांना बसला आहे.तेथील मुस्लिम बोर्डींग, नेहरू हायस्कूल येथे काही पूरग्रस्त कुटुंब आहेत. या कुटुंबासह पवारांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. झेंडावंदन जेथे झाले त्या मैदानातील उपस्थित भगिनींनी त्यांना राखी बांधून आपली आस्था आणि आपुलकी व्यक्त केली. आसपासच्या लोकांनी यथाशक्ती येथे मदतही दिली.

शरद पवार यांनी  कोल्हापूर येथील बापट कॅम्पमध्ये संत गोरा कुंभार वसाहतीत पूरग्रस्त झालेल्या नागरिकांची  भेट घेतली . याठिकाणी गणपती कारखाने मोठ्या प्रमाणात असून त्यांचेही नुकसान झाले आहे. आपद्ग्रस्तांच्या मागण्या प्रशासनाकडे तातडीने पोहचवण्याचे आश्वासन श्री. पवार यांनी यावेळी दिले.

जागेची पाहणी करून आर्थिक मदत सरकारने जाहीर करावी, जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सरकारने करावा, स्थानिकांवर असलेले कर्ज माफ करण्यात यावे व व्यापारात जे काही नुकसान झाले त्याचीही आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे श्री. पवार यावेळी म्हणाले .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com