sharad pawar call meeting ncp mla | Sarkarnama

शरद पवारांनी बोलावली 12 नोव्हेबररोजी राष्ट्रवादी आमदारांची बैठक 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान होताना दिसत आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 50-50 फॉर्म्युल्यामुळे शिवसेना नाराज आहे. त्यामुळे भाजप सत्ता स्थापन करू शकली नाही. शिवसेनेने अद्या आपले पत्ते उलघडलेले नाहीत. ती कोणाबरोबर जाणार ? शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होणार ? हे गणित पक्ष कसे सोडविणार अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्‍वभूमी कॉंग्रेसच्या आमदारांना जयपुरला हलविण्यात आले आहे. तर शिवसेनेचे आमदार मुंबईत मुक्कामाला आहेत. राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसे आमदार आपआपल्या घरी आहेत. राज्यपाल कोणाला सत्ता स्थापनेसाठी बोलावितात याकडेही राज्याचे लक्ष लागून राहिले असताना 12 नोव्हेबररोजी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होत आहे. श्री. पवार हे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख