जा, पण एखाद्याच्या पाया पडण्या इतपत स्वाभिमान गहाण ठेवू नका : पवार 

इतर पक्षात जा, पण एखाद्याच्या पायाचे दर्शन घेण्या इतपत स्वाभिमान गहाण ठेवू नका, असे सांगत स्वाभिमानाची नवी व्याख्या पहायला मिळाल्याचे खोचक वक्तव्य पवारांनी केले.
Sharad-Pawar-osmanabad
Sharad-Pawar-osmanabad

उस्मानाबाद :  राज्याचे पाणी धोरण ठरविण्याचे अधिकार १५ वर्षे तुमच्याकडे होते. तेव्हा काहीच करू शकला नाहीत. आमदार नसतानाही मंत्री केले . अन आता विकास करायचा म्हणून इतरत्र जात आहात, अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी डाॅ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह यांच्यावर  टीका केलीे. 

डॉ. पद्मसिंह पाटील शरद पवारांचे जुने सहकारी. डॉक्टर पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार प्रथमच जिल्ह्यात आले होते. तेव्हा ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विकास करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा पवार यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. पवार म्हणाले, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा स्थितीत येथील अनेक युवक बाहेरच्या जिल्ह्यात रोजगारासाठी जात आहेत. सुमारे १५ वर्षे राज्याचे पाणी धोरण ठरविण्याचे अधिकार तुमच्याकडे होते. तेव्हा तुम्ही विकास करू शकला नाहीत. तुम्ही साधे आमदारही नव्हतात,तेव्हा तुम्हाला मंत्री केले . तेव्हा विकास करण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले होते? 

सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करायचा असतो म्हणून आम्ही तुम्हाला सन्मानाची गादी दिली पण तुम्ही काम न करताच सत्तापदे भूषविली . असे म्हणत पवार यांनी पाटील यांच्यावर  खरमरीत टीका केली. सुमारे ४० ते ४५ वर्षे कायम सहकार्याची भूमिका घेतली.  १९७८ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत डॉ. पाटील यांना पहिल्यांदा आरोग्य सभापती करून मदतीचा ओघ सुरू केल्याची आठवणही पवार यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली. 

इतर पक्षात जा, पण एखाद्याच्या पायाचे दर्शन घेण्या इतपत स्वाभिमान गहाण ठेवू नका, असे सांगत स्वाभिमानाची नवी व्याख्या पहायला मिळाल्याचे  खोचक वक्तव्य पवारांनी केले. 

आमदार पाटील यांच्या सोलापूर येथील भाषणावरही पवार यांनी सडकून टीका केली. म्हणे आता जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक नाही! अरे हे युवकांचे प्रेम आहे ! तरुण पिढी पेटून उठलीय. आता अशा तरुणांनाच यापुढे संधी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com