अजून लय जणांना घरी पाठवायचंय : शरद पवार 

.
sharad-Pawar-
sharad-Pawar-

सोलापूर : " मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचेय.  ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचयं. मला काही लोकांच्याकडे बघायचयं," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या मिश्किल शैलीत म्हणाले आणि सभागृहात हशा उसळला आणि टाळ्यांचा  कडकडाट झाला. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते . यावेळी युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .  शरद पवार यांनी आपल्या भाषणात अमित शाह , विजयसिंह मोहिते पाटील आदींवर नाव न घेता घणाघाती टीका केली . 

श्री. पवार . म्हणाले, '' गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहासात जमा होणार आहेत. गेलेल्यांची चर्चा बंद करा. येणाऱ्यांची चर्चा करा.  भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल. विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल." 

पवार यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत आक्रमक शैलीत टीका केली . ते म्हणाले, "शरद पवार बरवाईट केले म्हणून कधी तुरुंगात गेले नाहीत . तुरुंगात गेलेल्यानी सांगू नये की शरद पवारांनी काय केले?"सोलापूरच्या सभेत अमित शहांनी शरद पवारांनी काय केले, असा सवाल विचारला होता. त्यांच्या या विधानाला शरद पवारांनी सडेतोड प्रत्त्युत्तर सोलापुरातच दिले . 

शरद पवारांनी आपल्या भाषणात किल्लारी भूकंपाचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "मी  मुख्यमंत्री असताना किल्लारीत  पहाटे भूकंप झाला. मुंबईहून निघून सकाळी सात वाजता  किल्लारीत दाखल झालो होतो. आजचे राज्यकर्ते काय करतात?  आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्ध्या तासात गायब होतात.  राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्काम करुन राहावे लागते. कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही." 

सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी बोलताना श्री. पवार म्हणाले, "माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली.  १९६५ साली राज्यातील तरुणांचे नेतृत्त्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. सोलापूर जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्याचा इतिहास वेगळा आहे . या जिल्ह्यातील लोक स्वाभिमानी आहेत. अशा स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात. सोलापूर जिल्हा कामगारांचा, शेतकऱ्यांचा जिल्हा आहे ." 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com