तुम्ही चाळीस वर्षे गवत उपटत होते का : शरद पवारांचा मधुकर पिचडांना तिखट सवाल

तुम्ही चाळीस वर्षे गवत उपटत होते का : शरद पवारांचा मधुकर पिचडांना तिखट सवाल

अकोले : आदिवासींचा विकास करण्यासाठी पक्ष सोडून गेलो असं सांगता, मग चाळीस वर्षे गवत उपटत होतात काय, असा तिखट सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजपवासी झालेले मधुकर पिचड यांनी अकोले (जि. नगर) येथील सभेत विचारला.

पिचड यांच्यासह त्यांचे चिरंजीव हे भाजपमध्ये जाऊन विधानसभा निवडणूक लढवित आहेत. या वेळी पवार यांनी जोरदार बॅटिंग केली.

पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांनी पिचड यांच्यावर सडकून टीका केली. शिवछत्रपती स्मारक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांच्याविषयी झालेल्या दिरंगाईबद्दल त्यांनी सरकारला धारेवर धरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. पण तेथे छमछम चालू करायला या सरकारने परवानगी दिली. यांना कसला शिवरायांचा अभिमान आहे, असा सवाल त्यांनी विचारला. 

पिचड यांना लक्ष्य करताना आदिवासींचा विकास करण्यासाठी गेलो असं ते सांगतात. मग चाळीस वर्षे काय गवत उपटत होतात काय? असा सवाल त्यांनी केली. पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही हातवारे करत टीका केली. मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. यांच्याशी काय कुस्ती खेळायची? असं म्हणत पवारांनी पुन्हा हातवारे केले.

अकोले तालुका आदिवासी, कष्टकरी, शेतकरी तालुका असल्याने तालुक्याचा चेहरा बदलण्याचे काम सत्तेचा वापर करुन केले अनेक योजना, प्रकल्प उभारले, पाणीवाटपात वाद झाले. त्यावेळी तासन्तास बसुन प्रश्न मार्गी लावला. तालुक्याचे हिताचे निर्णय घेतले.कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेतली असे सर्व काही दिलेलं असताना बरोबर असणारे तालुक्याचे नेतृत्व सोडून गेले त्यांना लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. मात्र आज ते म्हणताय कि अकोले तालुक्याच्या विकासासाठी भाजप मध्ये गेलोय ही गंमतीची बाब आहे. मग ४० वर्ष काय गवत उपटलं का, असा सवाल करुन आपण सखोल माहिती घेतली असता त्यांनी तालुक्याचा विकास करताना पलीकडच्या तालुक्यातही विकास केला. आदिवासीसाठी केलेल्या कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे पुढे मोठे संकट येणार असल्याचे दिसल्याने ते  अगोदरच भाजपात गेले असल्याची घणाघाती टीका पवार यांनी पिचड यांचे नाव न घेता केली.

घनसांगवीत घणाघात 

पाच वर्षात शिवसेना भाजपाकडे सत्ता असतांना त्यांनी शेती व शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले,  शेतकर्‍यांच्या डोक्यांवरील कर्ज माफ केले नाही. त्यामुळे मागील पाच वर्षाच्या युतीच्या काळात  16 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, अशी टीका त्यांनी घनसांगवी येथे केली. घनसावंगी  विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार राजेश टोेपे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.13)  आयोजित सभेत ते बोलत होते.  सभेस आमदार राजेश टोपे, अरविंद चव्हाण, डॉ.निसार देशमुख, राजाभाऊ देशमुख,कल्याण आखाडे, सतीश टोपे, अ‍ॅड संजय काळबांडे, बबलू चौधरी, उत्तमराव पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, शेत मालाला  भाव नाही,  ऊसाच्या पिकांला कर्ज नाही, विहीरीसाठी  व शेतीसाठी कर्ज घेतले तर विहीर  व शेतीवर जप्तीची कार्यवाही होत असल्याने कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येस  प्रवृत्त होत असल्याचे ते यावेही  म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस सांगतात की शेतकर्‍यांना पन्नास हजार कोटींचे बजेट दिले.  उपस्थित शेतकर्‍यांना  कर्जमाफी व अनुदान मिळाले का ? असा  प्रश्‍न विचारत या सरकारमध्ये शेतकर्‍यांना देण्याची दानत नसल्याचे त्यांनी सांगितले. कृषीमंत्री असतांना 70 हजार कोटीचे कर्ज माफ केले. शेतकर्‍यांच्या मालाला भाव देवून आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीलो.

मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस सांगतात की आमचा पैलवान कुस्तीसाठी तयार आहे. विरोधकांचे पैलवान तयार नाही.   हे खरे  आहे. कारण मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याने आम्ही खर्‍या पैलवानांशी लढतो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने  अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा  पंतप्रधानांच्या हस्ते  शुभारंभ केला. मात्र, पाच वर्षात  एक वीटही टाकली नाही.  इंदू मिल मध्ये डॉ. आबेंडकर यांचे स्मारक बनवायला   पाच वर्ष झाले. तो प्रश्‍न रेंगाळलेला आहे. शिवाजी महाराजाच्या  ज्या किल्ल्यांनी इतिहास नि.र्माण केला. त्या किल्ल्यांवर नाचगाणे, छमछमसाठी खुले करण्याचा निर्णय घेणारे शरद पवारांनी काय केल असे  विचारतात . आम्ही असे धंदे केले नाही. असा टोलाही त्यांनी भाजपा सरकारला यावेळी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com