शरद पवार म्हणाले, आज तू पांढरा शर्ट कसा घातलास?

कार्यकर्त्यांत मात्र चर्चा होती ती शरद पवार यांचे आपल्या कार्यकर्त्यांवर किती बारकाईने लक्ष असते याचीच !
Nilesh Raut and pawarsaheb-
Nilesh Raut and pawarsaheb-

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी कार्यमग्न आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. ते कितीही कामात असले तरी त्यांचे आपल्या सहकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर बारकाईने लक्ष असते. शरद पवार यांच्या स्मरणशक्तीची आणखी एक चुणूक शुक्रवारी औरंगाबाद येथे पाहावयास मिळाली.

शुक्रवारी एमजीएम विद्यापीठाचे संस्थापक अंकुशराव कदम यांच्या सत्कार सोहळ्यासाठी शरद पवार आले होते. सत्कार सोहळ्याचे आयोजक आणि प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नीलेश राऊत त्यांचे स्वागत करण्यासाठी गर्दीतून पुढे सरसावले. तेव्हा शरद पवार यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, नीलेश तू आज पांढऱ्या रंगाचा सदरा कसा काय घातलास?

शरद पवार यांच्या गुगलीने नीलेश राऊत थोडे गोंधळले. मग म्हणाले, तसे काही नाही साहेब, सहज घातला.

त्यावर शरद पवार त्यांना म्हणाले, तुला माहिती आहे का नीलेश? आपल्या पक्षात दोनच माणसे सहसा पांढऱ्या रंगाचा शर्ट सहसा घालत नाहीत, असे माझे निरीक्षण आहे. त्यापैकी एक जितेंद्र (आव्हाड) आणि दुसरा तू ! तुम्ही दोघे नेहमी रंगीबेरंगी शर्ट वापरता, पांढरा शर्ट वापरत नाहीत.

हे सगळे संभाषण ऐकत असलेले दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, विक्रम काळे, सतीश चव्हाण आदी नेते शरद पवारांच्या बोलण्यानंतर मोठमोठ्याने हसू लागले पण कार्यकर्त्यांत मात्र चर्चा होती ती शरद पवार यांचे आपल्या कार्यकर्त्यांवर किती बारकाईने लक्ष असते याचीच !
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com