पंतप्रधानांना साथ द्यावी : शरद पवारांचे आवाहन 

पाश्‍चिमात्यांच्या तुलनेत भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक आहे. तरीही युरोप किंवा अमेरिकेशी तुलना करणे योग्य होणार नाही. या रोगावर मात करण्यासाठी सर्व बाजूने पावले उचलली गेली आहेत.
corona issues
corona issues

सातारा : सध्याच्या कोरोनाची परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी तीन मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याची भुमिका जाहीर केली आहे. त्याला सर्व राज्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन तीन मेपर्यंत राबवायचे असून त्याला पूर्णपणाने सहकार्य करायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले. 

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना श्री. पवार म्हणाले, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काल (मंगळवारी) देशाला उद्देशून काही सूचना केल्या. काही
कार्यक्रमांची मांडणी त्यांनी जनतेसमोर केली. त्यांच्या भूमिकेला सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे.

शरद पवार म्हणाले, प्रधानमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. तसेच सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद केला. सर्वांना एकत्रित या संकटाशी सामना कसा करायचा याबाबतची चर्चा त्यांनी केली. प्रधानमंत्र्यांनी जी भूमिका घेतली तशीच भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्याच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे. श्री. ठाकरे सातत्याने जनतेशी सुसंवाद ठेवत आहेत.

अन्य, राज्यात तेथील प्रमुख जनतेशी उत्तम प्रकारे संवाद ठेवत आहेत. जनतेला धीर देत आहेत.  सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात प्रधानमंत्र्यांनी तीन मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्याला सगळ्या राज्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन तीन मेपर्यंत राबवायचे असून त्याला पूर्णपणाने सहकार्य करायचे आहे.

पाश्‍चिमात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडील स्थिती वेगळी असली तरी कोरोनाची लागण चिंताजनक आहे. काल सायंकाळपर्यंत अकरा हजार 439 रूग्ण देशात आहेत. 1306 रूग्ण बरे झाले आहेत. तर 377 रूग्ण दुर्दैवाने या उपाय योजननेला सामोरे जायला कमी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विशिष्ट वयावरिल व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाला बळी पडणाऱ्यामध्ये अनेकजण अन्य रोगाने व्यापलेले होते. तरीही मृतांची संख्या चिंताजनक आहे.

पाश्‍चिमात्यांच्या तुलनेत भारतीयांची प्रतिकारशक्ती अधिक आहे. तरीही युरोप किंवा अमेरिकेशी तुलना करणे योग्य होणार नाही. या रोगावर मात करण्यासाठी सर्व बाजूने पावले उचलली गेली आहेत. 

परराज्यातील कामगारांचा प्रश्‍न.... 
सध्या बाहेरच्या जिल्हा व राज्यातून आलेल्या कामगारांचा प्रश्‍न महत्वाचा आहे. ते आता आपल्या गावाकडे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांना प्रवास करण्यासाठी
सुविधा देऊ शकत नाही. अनेक ठिकाणी त्यांना दोन वेळेचे अन्न देण्याचा प्रयत्न होत आहे. सेवाभावी संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे मी
आभार मानतो. बांधकाम कामगारांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना अर्थसहाय्य करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी
निधी उपलब्ध करून कामगारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 

कोरोना विरोधातील लढ्यात सर्व घटक.... 
कोरोना विरोधातील लढ्यात समाजातील सगळे घटक उतरले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वत्र काम करत आहेत. तसेच अन्य राष्ट्रीय पक्षाचे घटकांचेही काम
सुरू आहे. यामध्ये कोणी यामध्ये राजकारण आणत नाही ही जमेची बाजू आहे. स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना, उद्योजक, वैद्यकिय सेवा, शासकिय
कर्मचारी सगळे जण स्वत:ची चिंता न करता अडचणीत असलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही जमेची बाजू आहे, असेही त्यांनी नमुद केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com