थोडासा दिलासा : रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शरद पवारांनी केली मोठी घोषणा

राज्यातील विविध संस्था आपापल्या परीने मदत जाहीर करत आहेत.
sharad pawar
sharad pawar

सातारा : कोरोनाशी मुकाबला करताना लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. यासाठी रयत शिक्षण संस्थेचे सर्व सेवक आपले एक दिवसाचे वेतन सुमारे दोन कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, कोविड-१९ ह्या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकारमोठ्या धैर्याने करत आहे. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्याही प्रसंगी ज्ञानदानाचे कार्यकरणाऱ्या संस्था नेहमीच पुढे आल्या आहेत. परंतू संपुर्ण लॉकडाऊनमुळे रोग निवारण कामी शिक्षण संस्थांना सक्रीय होता येत नाही. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रक्कम धनादेशाद्वारे 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९' मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com