sharad pawar and state politics | Sarkarnama

सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना भाजपचीच - शरद पवार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मुंबई : राज्यात सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना आणि भाजपची आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले. अयोध्येतील निकालाचे स्वागत करून देशातील सर्व घटकांनी शांतता पाळून सलोखा राखावा असे आवाहनही त्यांनी केले. 

अयोध्येतील निकालाचे स्वागत करत असताना पत्रकारांनी त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, आम्ही पहिल्यापासून हेच सांगत आहोत की भाजप शिवसेनेला जनादेश मिळाला आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे आम्हाला विरोधात बसायला जनतेने कौल दिला आहे त्याचे पालन आम्ही करू असेही त्यांनी सांगितले. भाजप शिवसेनेला तुम्ही काय सल्ला द्याल असे विचारल्यावर, दोन मित्रांनी भांडू नये एवढेच मी सांगेन असे मिश्‍किलपणे ते म्हणाले. या दोन दोन पक्षांतील भांडणाबद्दल त्यांना विचारले असता, हे यापूर्वीही घडले आहे 2014 मध्ये त्यांच्यात जे भांडण सुरू होते त्यातून आम्हाला मराठी भाषेतील बरेच शब्द कळले असा टोलाही त्यांनी यावेळी मारला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख