प्रश्‍न सोडविण्यापेक्षा पुराच्या परिस्थितीचे मार्केटिंग करण्यात सरकारला रस : शरद पवार

प्रश्‍न सोडविण्यापेक्षा पुराच्या परिस्थितीचे मार्केटिंग करण्यात सरकारला रस : शरद पवार

कराड : पूर स्थितीत लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा मार्केटिंगमध्ये सरकारला अधिक रस दिसून येतो, असा टोला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज (कराड) येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकारला लगावला. कराड, तांबवे येथील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कराड येथे श्री. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या फूड पॅकेटवर मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सरकार मार्केटिंग करत असल्याचा टोला हाणला. 
पवार म्हणाले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रयत शिक्षण संस्थेने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन सुमारे दीड कोटी रुपये मदत देणार आहेत. 

सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मदतीचे केंद्र उभारले जाईल. यात साताऱ्यामध्ये सह्याद्री साखर कारखाना, सांगली जिल्ह्यात राजारामबापू कारखाना तसेच कोल्हापूर जिल्ह्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केंद्र केले जाईल. त्या माध्यमातून येणारी मदत संबंधित केंद्रात देऊन पूर बाधित लोकांना पोहोचवली जाईल. राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलचे 40 डॉक्‍टरांचे पथक ही पूरबाधितांच्या मदतीसाठी सक्रिय आहे. पूर परिस्थिती ओसरल्यावर पथक तपासणीसाठी रवाना होईल. शासन पूर परिस्थिती हाताळण्यात पूर्णता अपयशी ठरले आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा आपत्कालीन काळात ठामपणे काम करताना दिसली आहे अशे ते म्हणाले 

लातूरच्या भूकंपाने मी स्वतः ते अनुभवले आहे. त्यामुळेच त्या वेळी एक लाख घरे बांधू शकलो. राज्यकर्ते किती जागरूक आहेत, यावर प्रशासन काम करते. त्यामुळे जाईल त्या ठिकाणी प्रशासनावरील नाराजी लोकांनी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतनही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. त्याचा धनादेश लवकरच दिला जाईल. रोहित पवार यांच्या माध्यमातूनही पूरग्रस्तांना मदतीसाठी तीन ट्रक साहित्य येथे दाखल झाले आहे. त्यातील एक ट्रक सांगलीला रवाना झाला असून एका ट्रकमधील साहित्य कराड, पाटण तालुक्‍यासाठी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com