समीर भुजबळांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते उतरणार

समीर भुजबळांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते उतरणार

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून त्यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उतरत आहेत. श्री. पवार यांची 24 एप्रिलला सायंकाळी पाचला गिरणारे (ता. नाशिक) येथे सभा होत आहे. तसेच " स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील संभाजीची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे 26 एप्रिलला नाशिकमध्ये रॅली करतील. 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभा होतील. छगन भुजबळ यांची उद्या (ता. 22) सायंकाळी साडेसातला कथडा येथे, तर मंगळवारी (ता. 23) सकाळी दहाला ठाणगार (ता. सिन्नर) आणि दुपारी दोनला वावी येथे सभा होईल. शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी पाचला छगन भुजबळ आणि श्री. मुंडे यांची सिन्नर येथे सभा होणार आहे. 
भुजबळांच्या समवेत मलिक 
छगन भुजबळांच्या समवेत श्री. मलिक यांच्या सभा होतील. गुरुवारी (ता. 25) सायंकाळी पाचला इगतपुरी येथे, सायंकाळी सातला काळुस्ते येथे आणि रात्री आठला मध्य नाशिकमध्ये त्यांच्या सभा होणार आहेत. मतदारसंघाच्या रचनेचा विचार करत राष्ट्रवादीने सभांचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर "स्टार'ना प्रचारात उतरवत तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न राहील. सभांचे हे नियोजन पाहता, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 26 एप्रिलच्या नाशिकच्या सभेसाठी "स्पेस' उपलब्ध ठेवण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com