sharad pawar and phadnavis | Sarkarnama

पवार यांच्या मार्गदर्शनानंतर सरसकट कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्यातील तिढा मात्र लवकरच सुटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कर्जमाफीच्या संदर्भात माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने अनुकूलता दर्शवली आहे. यासाठी विचारनिमिय करून त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याने येत्या काळात सरकारकडून ठरविण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या निकषांमध्ये अधिकाधिक कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नवी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत सरकारकडून कर्जमाफीच्या संदर्भात पवार यांचे मार्गदर्शन आणि घेण्यात आले. यात 30 जूनपर्यंच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल यासाठी विचारविनिमय करण्यात आला. यात कर्जमाफी देण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यासाठीच्या सूचना पवार यांनी सरकारला दिल्या असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,माजी वित्तमंत्री जयंत पाटील आदी उपस्थित होते. 

या बैठकीत सरकारकडून 30 जून 2016 पर्यंतचे थकित कर्ज आहे, त्यांचे 1 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगितले, या कर्जासाठी सरकारला 25 हजार कोटींची गरज पडेल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यावर माजी कृषीमंत्री पवार यांनी राज्यातील आर्थिक स्थितीचा विचार करून अधिकाधिक आणि सरसकट शेतकऱ्यांचे समाधान कसे करता येईल यासाठी समन्वय साधता कसा येईल यावर सरकारने भर द्यावा अशी सूचना केली. तर त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची माहितीही त्यांनी दिल्यानंतर सरकारकडून याविषयी समाधान व्यक्‍त करत राज्यातील थकित कर्जदार शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले. 

दरम्यान, या कर्जमाफीसाठी निकष ठरविताना आजपर्यंत जे थकित कर्जदार शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी आपण आग्रही असून सरकारने काढलेला जीआर हा कसा चुकीचा आहे, यासाठी आपण सात पानांचे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून त्याचा सरकारने विचार केल्यास राज्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख