शिवसेनेबरोबरच्या आघाडीसाठी सोनिया गांधी यांना " त्या तीन ' बाबी सांगितल्या - शरद पवार

सोनिया गांधी यांना मी त्याचवेळी असे सांगितले की, राज्यात परिवर्तनाचा संदेश द्यायचा असेल तर तुम्ही शिवसेनेबरोबर आले पाहिजे ही नवी रचना आहे, हा नवा रस्ता तयार होईल त्यासाठी आपण हे केले पाहिजे, भविष्यात हा रस्ता व हे परिवर्तन देशात पोहचेल असे मी त्यांना सांगितले हे त्यांना पटले त्यामुळे त्या शिवसेनेबरोबर येण्यास तयार झाल्या असेही श्री. पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.
 शिवसेनेबरोबरच्या आघाडीसाठी सोनिया गांधी यांना " त्या तीन ' बाबी सांगितल्या - शरद पवार

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या अशा त्या तीन बाबी मी त्यांच्या कानावर घातल्या त्यांना या तीन बाबी निदर्शनास आणून दिल्या आणि त्यांना राज्यातील या परिवर्तनाच्या सहमतीसाठी तयार केले असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. एका खासगी वाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीत राज्यातील सत्तानाट्यातील अनेक पैलूवर प्रकाश टाकला. 

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांना शिवसेनेबरोबर येण्यासाठी तुम्ही कसे तयार केलेत या प्रश्‍नावर शरद पवार म्हणाले, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. देशातील हा एकमेव राजकीय नेता होता तसेच त्यांनी इंदिरा गांधी यांना मदत व्हावी यासाठी 1980 मध्ये आपल्या पक्षाचे उमेदवारच उभे केले नव्हते हा मोठा निर्णय होता, हा निर्णय व त्यावेळची स्थिती मी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रतिभाताई पाटील यांना प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेना एनडीअेमधून बाहेर पडलेली नव्हती तरीही त्यांनी कॉंग्रेसला मदत केली होती. त्यामुळे या तीन बाबी लक्षात घेता आपण शिवसेनेला पाठिंबा द्यायचा नाही अशी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही असे मी त्यांना सुचवले. त्यानंतर त्यांनी जयपूरमधल्या कॉंग्रेसच्या आमदारांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली त्यांचेही मत माझ्या भूमिकेला पुरक होते. 

सोनिया गांधी यांना मी त्याचवेळी असे सांगितले की, राज्यात परिवर्तनाचा संदेश द्यायचा असेल तर तुम्ही शिवसेनेबरोबर आले पाहिजे ही नवी रचना आहे, हा नवा रस्ता तयार होईल त्यासाठी आपण हे केले पाहिजे, भविष्यात हा रस्ता व हे परिवर्तन देशात पोहचेल असे मी त्यांना सांगितले हे त्यांना पटले त्यामुळे त्या शिवसेनेबरोबर येण्यास तयार झाल्या असेही श्री. पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com