sharad pawar and nashik cooperative movement | Sarkarnama

शरद पवार उद्या नाशिकमध्ये, "सहकाराला बुस्ट देणार का? याची उत्सुकता

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नाशिकचे राजकारणापलीकडचे वेगळे नाते आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर उद्या (ता. 17) त्यांचा दौरा होत आहे. यापूर्वीच्या दौऱ्यात त्यांनी निवडणुका संपल्यावर जिल्ह्याच्या प्रश्‍नात लक्ष घालणार असे सांगितले होते. त्यामुळे उद्याच्या दौऱ्यात शरद पवार जिल्ह्याच्या सहकाराला बुस्ट देणार का? याचीच उत्सुकता आहे. 

ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्या 90 व्या वाढदिवासानिमित्त अभिष्टचिंतनाचा सोहळा उद्या (ता.17) शहरात होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात, समाजकारणात आघाडीवर राहिलेल्या हिरे घराणे आघाडीवर राहिले आहे. (कै) भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर व्यंकटराव हिरेंचा राजकीय वारसा पुष्पाताई हिरे यांनी सांभाळला. त्या शरद पवारांशी एकनिष्ट असलेल्या नेत्या मानल्या जातात. 1990 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांच्या समर्थनार्थ राजीनामे देणाऱ्या सात मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेष होता. सलग तीन टर्म त्या राज्याच्या आरोग्य मंत्री राहिल्या आहेत. उद्या त्यांच्या अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलगा व माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, अद्वय हिरे हे तीन पिढ्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर एकत्र येतील. त्यामुळे या कार्यक्रमाविषयी राजकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर शरद पवार नाशिकला येत आहेत. छगन भुजबळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधीक सहा आमदार विजयी झाले आहेत. निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या प्रश्‍नांत लक्ष घालणार असे आश्‍वासन श्री. पवार यांनी दिले होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंक, निफाड आणि नाशिक या साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी काही आमदार श्री. पवार यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. त्यातून या प्रश्‍नाला बुस्ट मिळणार का? याची चर्चा व उत्सुकता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख