"साहेब, तुमच्या येण्याने लढण्याचं बळं मिळाले,' पवार यांच्याजवळ व्यक्त केली एका उपसरपंचांनी गावाची भावना...

 "साहेब, तुमच्या येण्याने लढण्याचं बळं मिळाले,' पवार यांच्याजवळ व्यक्त केली एका उपसरपंचांनी गावाची भावना...

पुणे : " साहेब तुम्ही सत्तेत हुता तवाबी मोठा पूर आला हुता पण अशी वाईट वेळ आमच्यावर आली नव्हती पण आता काही खरं न्हाई. तुम्ही आला लै बरं वाटतय. आधार वाटतुया ' अशा भावना तांबवे कराड येथील उपसरपंच धनंजय ताते यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त तांबवे गावाला काल भेट दिली. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे,आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार उपस्थित होते. 

ताते म्हणाले," साहेब आमच्या गावाला पूर येणे नवी गोष्ट नाही, पूर येतो आणि सरकार मदत करते. साहेब तुम्ही सत्तेत असतानाही पूर आला होता पण अशी वाईट वेळ तुम्ही आमच्यावर येऊ दिली नव्हती. पण आज मात्र तुम्ही सत्तेत नाही आणि आमच्यावर वाईट वेळ आलेली आहे. साहेब, तुम्ही गावात आलात आणि आम्हाला खूप आधार वाटला. या वयातही तुम्ही आमची हाक ऐकून आलाय. त्यामुळे आम्हाला या संकटाशी लढण्याच बळ मिळाले आहे.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com