बाबासाहेबांच्या घटनेतील मजबूत चौकटीमुळे देश एकसंघ - शरद पवार

बाबासाहेबांच्या घटनेतील मजबूत चौकटीमुळे देश एकसंघ - शरद पवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या परकीय शिक्षणासाठी मदत केली. माणगावच्या परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच या उपेक्षित समाजाचे नेते आहेत, तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला असा नेता मिळाला, असा उल्लेख राजर्षी शाहूंनी केला होता. पुढे याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. आजूबाजुचे इतर देश उलथे पालथे झाले असताना भारत मात्र एकसंघ राहिला. याचे एकमेव कारण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेली घटनेची मजबूत चौकट हेच आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. 

येथील राजर्षी शाहू समाधीचा लोकार्पण सोहळा श्री. पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. पवार म्हणाले, "छत्रपती शाहूंच्या विविध कार्याचे पैलू उघडताना शरद पवार म्हणाले,तत्कालीन समाजात जाती,धर्माच्या भक्कम भिंती उभारल्या असताना समाजात समता आणण्यासाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय घेणे, ही सोपी गोष्ट नव्हती. छत्रपती शाहूनी तसा निर्णय घेतला आणि तो लागूही केला. आजही समाजात आरक्षणाबद्दलचे निर्णय लोकांना पचणी पडत नाहीत. मी मुख्मंत्री असताना महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.त्यानंतरच्या निवडणुकीत माझ्या पक्षातील अनेकांचा पराभव झाला.त्यावेळी मी माझ्या संबधित कांही गावातील लोकांना विचारले की, तुम्ही आम्हाला झटका का दिला?त्यावेळी लोकांनी सांगीतले की, तुम्ही आरक्षण दिल्यामुळे लहान समाजातील महिला आज सरपंच म्हणून बसली आहे,त्यामुळे आमच्या हातून गावचा कारभार गेला आहे.ही आजची परिस्थिती आहे,लोकांना असले निर्णय पचनी पडत नाहीत.त्या काळात आरक्षण लागू करण्याचा निणंय घेणे आणि ते लागू करणे हे सोपे नव्हते,पण हे राजर्षी शाहूंनी करुन दाखविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com