पवार आणि तावरे एका व्यासपीठावर येणार....`माळेगाव`च्या निवडणुकीचे काय होणार?

...
pawar and taware share dais
pawar and taware share dais

माळेगाव : बारामती तालुक्याच्या राजकारणात माळेगाव कारखाना हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला. या कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर चुरशीच्या लढती अपेक्षित असताना मात्र उद्या सोमवार (ता.६) रोजी राष्ट्रवादी व भाजपचे परस्परविरोधी नेते माळेगावात एका व्यासपीठावर येत आहेत.

निमित्त जरी शिवनगर शिक्षण संस्थेतील महिला वसतीगृहाच्या उद्घाटनाचे असले, तरी या कार्यक्रमाला मात्र झालर एकमेकांच्या समन्वयाची आहे. त्यामुळे सोमवारच्या सभेत शरद पवार, अजित पवार, चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे नेतेमंडळी जाहिर सभेत काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याशी संलग्न शिवनगर विद्या प्रसारक मंडळाने सुमारे ७ कोटी रूपये खर्च करून नव्याने उभारलेल्या महिला वसतिगृहाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्य़क्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे असणार आहेत. विशेषतः शिवनगर संस्थेचे विश्वस्त या नात्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना निमंत्रीत केले आहे.

त्यानिमित्ताने जाहिर सभेची तयारी कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे नेते रंजन तावरे, विश्वस्त संग्राम काटे, जी.बी.गावडे, संजय तावरे, अनिल जगताप, रमेश देवकाते यांनी केली आहे. एकाबाजूला माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत,

या कार्य़क्रमाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर येत असल्याने तालुक्याच्या राजकारणात एकच चर्चेचा विषय झाला आहे. याचा विचार करता माळेगावच्या आगामी निवडणूकीत बिनविरोधबाबत सन २००२ ची पुनरार्वृती तर होणार नाहीना ? अशीही कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळते.

पवारसाहेब आणि चंद्रराव तावरे हे बालमित्र आहेत. त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकते हे मात्र कोणही नाकारू शकत नाही. सन १९९७ मध्ये कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करीत चंद्रराव तावरे यांनी सत्तांतर घडवून आणले होते. त्यानंतर सन २०१५ मध्ये पुन्हा चंद्रराव तावरे यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करीत व रंजन तावरे यांना बरोबर घेत माळेगावमध्ये सत्ता बदल केला. दरम्यानच्या कालावधीत चंद्रराव तावरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थित भाजप पक्षातही प्रवेश केला आहे. 


..पण संस्थांवर परिणाम नाही...! 
माळेगाव कारखान्याच्या स्थापनेपासून अनेकदा रायकिय स्थित्यंतर झाली. परंतु, त्याचा परिणाम कारखाना अथवा शिवनगर शिक्षण संस्थेच्या प्रगतीवर झाला नाही. कारखान्याशी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार तहह्यात अध्यक्ष म्हणून शरद पवार कामकाज पाहतात, तर तहह्यात विश्वस्तात अजित पवार, सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. घटनेनुसार साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे वरील नेत्यांच्या समन्वयातून या शिक्षण संस्थेत उपाध्यक्ष पदावरून कामकाज पाहतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com