अजित पवारांनी पक्षाकडे असलेल्या आमदारांच्या सह्या असलेल्या याद्या दिल्या असाव्यात - शरद पवार

अजित पवारांनी पक्षाकडे असलेल्या आमदारांच्या सह्या असलेल्या याद्या दिल्या असाव्यात - शरद पवार

मुंबई : पक्षाच्या कार्यालयात असलेल्या आमदारांच्या सह्या असलेल्या याद्या अजित पवार यांनी राज्यपालांना सादर केल्या असाव्यात, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नाही, त्यांच्या पत्राशी व निर्णयाशी पक्षाचा संबंध नाही असा स्पष्ट खुलासा करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे आज स्थापन झालेले सरकार आपले बहुमत सदनात सिद्ध करू शकणार नाही असा निःसंदिग्ध दावाही यावेळी केला. 
राज्यपालांचे कार्यालय फारच कार्यक्षम झाले असावे असा टोमणाही शरद पवार यांनी मारला, साऱ्या घटनाक्रमाबद्दल सांगताना ते म्हणाले सकाळी साडेसहा वाजता राज्यपाल भवनात काहीतरी हालचाल सुरू आहे असे आम्हाला कळले त्यानंतर तीन आमदार आमच्याकडे आले. डॉ. राजेद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर आणि पक्षाचे आणखी एक सदस्य आमच्याकडे आले आणि आम्हाला दिशाभूल करून राजभवनावर नेण्यात आल्याचेही त्यांनी आम्हाला सांगितले. 

यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सकाळी कशा घटना घडत गेल्या त्याची तपशीलवार माहिती दिली या माहितीला संदीप क्षीरसागर आणि अन्य एका आमदारांनी दुजोरा दिला. शरद पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच जयंत पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com