चेतन तुपेंसारख्या तरुणांच्या नेतृत्वाची फळी राज्यात उभी करायचीय : शरद पवार

चेतन तुपेंसारख्या तरुणांच्या नेतृत्वाची फळी राज्यात उभी करायचीय : शरद पवार

हडपसर : मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्रात निवडणूकच नाही. इथे विरोध करायला माणसंच नाहीत. निवडणुकीची मजा येत नाही. मग देशाचे पंतप्रधान नऊ वेळा महाराष्ट्रात का येतात? विरोधकच नाही, मग गृहमंत्री कानाकोपऱ्यात फिरून 20 सभा का घेतात?, मुख्यमंत्री प्रत्येक तालुक्‍यात का हिंडतात?, त्यांना आता कळले आहे की, या जनतेच्या मनात भाजपबद्दल, सरकारबद्दल नाराजी आहे. महाराष्ट्रातील जनता यांना पाठिंबा देईल याची खात्री त्यांना नाही, अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

महाआघाडीच्या उमेदवारांच्या झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक वैशाली बनकर, प्रशांत जगताप, आनंद अलकुंटे, योगेश ससाणे, हेमलता मगर, नंदाताई लोणकर, पूजा कोद्रे, अनिस सुंडके, हाजीगफूर पठाण, रईस सुंडके, नारायण लोणकर, प्रशांत तुपे, निलेश मगर, प्रविण तुपे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप वाजवीत असलेल्या कलम 370 रद्दच्या तुणतुणेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हडपसर सभेत चांगलेच फटकारले. काहीही झाले तरी, कलम 370 आम्ही रद्द केले. शेतकरी आत्महत्या झाल्या कलम 370, कारखाने बंद पडले कलम 370, बेरोजगारी वाढली तरी कलम 370 अशी उपरोधिक टीका यावेळी पवार यांनी केली.

राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका करतांना पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक बांधण्याची हमी देऊन, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, अशी आश्वासने देऊन भाजप सत्तेत आली. पण पाच वर्षे झालीत पण छत्रपतींच्या स्मारकाची एक वीट सुद्धा रचली नाही आणि शेतकारी कर्जमाफी झाली नाही.

हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे हे उच्च शिक्षित तरुण आहे. तो आमदार व्हावा, एवढीच इच्छा नसून, राज्यात तरुणांची फळी निर्माण करून तुपे यांच्या सारखे अनेक कर्तृत्वान युवा यांचेकडे राज्याची सूत्रे सोपवायची आहेत. त्यामुळे तुपे यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणा, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com