Sharad Joshi's Statue will be Elected At Nampur in Nashik District | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

कृषी आंदोलनाची पंढरी नामपूरला उभारणार शरद जोशींचा पुतळा 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

नाशिक जिल्ह्यातून (कै) शरद जोशी यांच्या विचारांना सर्वाधिक पाठींबा मिळाला. ऊस उत्पादकांसह अन्य प्रश्‍नांवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन येथेच उभे राहिले. त्यानंतर त्याचा प्रसार सबंध राज्यात झाला. त्यामुळे बागलाण, निफाड तालुक्‍यांत त्यांचे गावोगावी समर्थक आहेत. याच समर्थकांच्या पुढाकाराने येथे शरद जोशी विचार मंच स्थापन करण्यात आला आहे. आता शरद जोशी यांचा राज्यातील पहिला पुतळा बाजार समितीत उभारला जाणार आहे. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून (कै) शरद जोशी यांच्या विचारांना सर्वाधिक पाठींबा मिळाला. ऊस उत्पादकांसह अन्य प्रश्‍नांवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन येथेच उभे राहिले. त्यानंतर त्याचा प्रसार सबंध राज्यात झाला. त्यामुळे बागलाण, निफाड तालुक्‍यांत त्यांचे गावोगावी समर्थक आहेत. याच समर्थकांच्या पुढाकाराने येथे शरद जोशी विचार मंच स्थापन करण्यात आला आहे. आता शरद जोशी यांचा राज्यातील पहिला पुतळा बाजार समितीत उभारला जाणार आहे. 

बिजोरसे (ता. बागलाण) सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यक्रम झाला. यावळी प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षस्थानी सभापती भाऊसाहेब भामरे होते. शरद जोशी विचार मंचचे संस्थापक खेमराज कोर, सरपंच अशपाक पठाण, जेष्ठ नेते अशोक सावंत, दीपक पगार यांसह विविध नेते उपस्थित होते. येत्या 12 डिसेंबरला शरद जोशी पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल. यावेळी शरद जोशी यांचा पुतळा बसविण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला. 

यावेळी सभापती भाऊसाहेब भोमरे म्हणाले, "शरद जोशी यांच्या विचार व प्रेरणेमुळेच आज बळिराजाचे अस्तित्व टिकून आहे. त्यांच्या सहवासात आपण काम केले. शेती व शेतकऱ्यांकडे पाहण्याची नीव दृष्टी आम्हाला मिळाली. त्यामुळे जनतेत त्यांचे स्मरण कायम रहावे यासाठी विचार मंचची स्थापना केली आहे. येत्या 12 डिसेंबरला पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. त्यावेळी हा पुतळा बसविला जाईल." 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख