shantunu goel is new bhandara collector | Sarkarnama

भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी शांतनु गोयल रुजू 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 जून 2018

जिल्हाधिकारी म्हणून आज शांतनु गोयल यांनी मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पदभार स्विकारला. सुहास दिवसे यांची नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे. आज ते कार्यमुक्त झाले. 

भंडारा : जिल्हाधिकारी म्हणून आज शांतनु गोयल यांनी मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पदभार स्विकारला. सुहास दिवसे यांची नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे. आज ते कार्यमुक्त झाले. 

शांतनु गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2012 बॅचचे आय.ए.एस अधिकारी आहेत. भंडारा जिल्हाधिकारी या पदावर रुजू होण्यापूर्वी गोयल हे महानगर पालिका नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात चंद्रपूर जिल्हयातील राजूरा येथील उपविभागीय अधिकारी या पदापासून केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली या ठिकाणी सुध्दा त्यांनी काम केले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, उपवन संरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, अर्चना मोरे, शिल्पा सोनाले व सर्व तहसिलदार आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

राजकीय अपडेटसाठी सरकारनामाचे ऍप डाउनलोड करा. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख