शंकरराव गडाख यांना अटक 

शंकरराव गडाख यांना अटक 

नगर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जेलभरो आंदोलन करत असताना आज क्रांतिकारी पक्षाचे नेते, माजी आमदार शंकरराव गडाख यांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले. 

शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावे, दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर मिळावा,  स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागण्यांसाठी शेतकरी क्रांतीकारी पक्ष व शेतकरी सुकाणू समिती यांच्यावतीने आज नेवासे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या वेळी जेलभरो आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी माजी आमदार गडाख यांना अटक करीत नंतर सोडून दिले. बाबा आरडगे, बन्सी सातपुते, अशोक गायकवाड, दिगंबर रिंधे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com