"पीएमपीएमएल'च्या संचालकपदासाठी शंकर पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील भाजपाचे त्यातही गेल्या निवडणुकीपूर्वी इतर पक्षांमधून भाजपात आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. इतर पक्षातून भाजपात येऊन नगरसेवक झालेले अनेकजण नाराज आहेत. यातील काहीजण वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत. काहीजणांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चादेखील केल्याचे सांगण्यात येत आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शंकर पवार यांची नियुक्ती ही नाराजांना खूष करण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
 "पीएमपीएमएल'च्या संचालकपदासाठी शंकर पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचालक मंडळावर संचालक म्हणून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक शंकर पवार यांच्या नावावर पक्षाच्यावतीने शिक्कामोर्तब करण्यात आले असून लवकर त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. पवार यांच्या नियुक्तीमुळे भाजपातील नाराजांना सत्तेच्या पदांवर संधी द्यायला सुरवात झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. 

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. आमदार झाल्यानंतर पक्षाच्यावतीने आमदार शिरोळे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शिरोळे यांनी राजीनामा दिल्यांनतर त्या जागेवर नगरसेवक पवार यांची नियुक्ती केली जाणार आहे. " पीएमपीएल'वर संचालकर म्हणून महापालिकेच्यावतीने एका नगरसेवकाची नेमणूक करण्यात येते. नव्या इलेक्‍ट्रिक बस खरेदी, सीएनजी बसखरेदी तसेच पीएमपीच्या कामातील सुधारणा ही मोठी आव्हाने सध्या "पीएमपीएल'च्या प्रशासनासमोर आहे. 

या सर्व प्रक्रियेत संचालकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे पवार यांच्या नेमणुकीला "पीएमपीएमएल' व महापालिकेच्या दृष्टीने महत्व आहे. पवार हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्त्ताखाली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते विजयी झाली. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील भाजपाचे त्यातही गेल्या निवडणुकीपूर्वी इतर पक्षांमधून भाजपात आलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. इतर पक्षातून भाजपात येऊन नगरसेवक झालेले अनेकजण नाराज आहेत. यातील काहीजण वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत. काहीजणांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी चर्चादेखील केल्याचे सांगण्यात येत आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शंकर पवार यांची नियुक्ती ही नाराजांना खूष करण्याच्या मोहिमेचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com