मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर शनिदेवाला अभिषेक अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या यशासाठी साकडेही

मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर शनिदेवाला अभिषेक अन्‌ मुख्यमंत्र्यांच्या यशासाठी साकडेही

नगर : शनी शिंगणापूर (ता. नेवासे) येथे शेतकरी वारकरी महासंमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आता मराठा समाजाने मोर्चे काढण्याऐवजी जल्लोष करा' अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानुसार आरक्षण मिळाले आणि काल न्यायालयाने ते वैध ठरविले. त्यामुळे आज मराठा कार्यकर्त्यांनी शनिदेवाला अभिषेक घातला. तसेच आरक्षण देणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत आगामी निवडणुकीत यश मिळण्यासाठी शनिदेवाला साकडे घातले. 

अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. शेतकरी मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक कार्यकर्ते आज जमले होते. दहातोंडे यांच्यासह युवक मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष नानावटे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे बलिदान व मराठा समाजातील कोपर्डीची निर्भया यांना आरक्षणाचे श्रेय जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायालयात टिकणारे आरक्षण तयार केले. बोले तैसा चाले, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत, यामुळे हे आरक्षण मिळाले आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे, असे मत दहातोंडे यांनी व्यक्त केले. 

आरक्षणाच्या वेळी ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी शेतकरी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे, युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओम काळे, पोलीस पाटील सयाराम बानकर, बिभीषण खोसे आदी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करीत आगामी काळात समाजातील कार्यकर्त्यांनी अशीच एकजुट ठेवावी, असे आवाहन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com