shanbhuraj desai and patankar | Sarkarnama

देसाई घराण्याच्या व कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका - शंभूराज देसाई

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

मोरगिरी : मला राजकारणातून संपविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र " तिसरी पिढी' उद्धार करते असे म्हटले जाते. शंभूराज ही देसाई घराण्यातील तिसरी पिढी आहे. 2004 आणि 2014 या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ज्यांनी देसाई घराणे राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या विरोधकांना माझे थेट आव्हान आहे. त्यांनी 2004 आणि 2009 मधील देसाई यांच्याच मतांधिक्‍याची बेरीज करावी,असे आव्हान पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांना देऊन मी ही लोकनेते बाळासाहेब यांचाच नातू आहे, देसाई गटाचा कार्यकर्ता एकदा इर्षेला पेटला की कसा विक्रम होतो ते संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले आहे.

मोरगिरी : मला राजकारणातून संपविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र " तिसरी पिढी' उद्धार करते असे म्हटले जाते. शंभूराज ही देसाई घराण्यातील तिसरी पिढी आहे. 2004 आणि 2014 या दोन पंचवार्षिक निवडणुकीत ज्यांनी देसाई घराणे राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या विरोधकांना माझे थेट आव्हान आहे. त्यांनी 2004 आणि 2009 मधील देसाई यांच्याच मतांधिक्‍याची बेरीज करावी,असे आव्हान पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांना देऊन मी ही लोकनेते बाळासाहेब यांचाच नातू आहे, देसाई गटाचा कार्यकर्ता एकदा इर्षेला पेटला की कसा विक्रम होतो ते संपूर्ण जिल्ह्याने अनुभवले आहे. त्यामुळे देसाई घराण्याच्या आणि देसाई गटाच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नका असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. 

दौलतनगर (ता. पाटण, जि.सातारा) येथे आपल्या 52 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सभेत शंभूराज देसाई बोलत होते. आमदार देसाई म्हणाले, राज्याच्या राजकारणातील कर्तबगार आणि स्वाभिमानी मंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्या मंत्रिपदाचा लाथ मारून स्वाभिमान जपला. कै. वसंतराव नाईक यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद आणि लोकनेते यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरला. केवळ लोकनेत्यांच्या कर्तबगार नेतृत्व आणि करारीबाण्यामुळे राज्यातील तत्कालीन इतर मातब्बर कॉंग्रेसवाल्यांची नावे पडद्याआड जातील या भितीमुळे कुटील डाव रचून लोकनेत्यांना मुख्यमंत्री पदापासून जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचे कारस्थान त्यावेळच्या कॉंग्रेसने केले. आणि म्हणूनच कसलाही विचार न करता लोकनेत्यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. आता तेच कारस्थान पुढे स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या राजकीय जीवनात घडवून तत्कालीन कॉंग्रेसने देसाई घराण्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. 

विरोधकांच्या हातात 2009 ते 2014 या कालावधीत पाटणची आमदारकी होती. तर 2014 ते 2019 या कालावधी मध्ये माझ्या हातात आमदारकी जनतेने सोपवली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेने आपल्या गावांत झालेल्या विरोधकांच्या आणि माझ्या पाच वर्षातील विकासकामांची तुलना करावी आणि यामध्ये विरोधकांपेक्षा एक रुपयाचे जरी काम जादा झाले असेल तर विकास काम पाहून जनतेने मतदान करावे आणि 2019 चा आमदार निवडावा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. 

आपण 2014 च्या वचननाम्याची पुर्तता करूनच 2019 च्या निवडणूकीसाठी समोरे जाणार असून त्याचबरोबर 2014 च्या निवडणुकीमध्ये दौलतनगर येथील सभेत ज्याप्रमाणे देसाई गटाचाच गुलाल उधळण्याचा निर्धार करण्यात आला होता त्याप्रमाणे यावेळी वर्षभर अगोदरच 2019 चा गुलाल या ठिकाणीच उधळण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी आई श्रीमती विजयादेवी देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, स्मितादेवी देसाई, अस्मितादेवी देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, तसेच कराड दक्षिण चे ऍड. उदयसिंह पाटील, तसेच कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख