shamburaj desai press conference | Sarkarnama

जनतेला जी आश्‍वासने दिली ती पाळली,95 टक्के कामे पूर्ण : शंभूराज देसाई 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड : पाटण विधानसभा मतदार संघाची निवडणुक लढवताना जनतेला मी जी आश्वासने दिली, जो वचननामा सादर केला होता त्यातील 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामेही येणाऱ्या काळात पुर्ण होतील. मी चार वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणला आहे. या निधीतून कामे पूर्ण होत आहेत. याचे मला समाधान आहे, असे मत आमदार शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

कऱ्हाड : पाटण विधानसभा मतदार संघाची निवडणुक लढवताना जनतेला मी जी आश्वासने दिली, जो वचननामा सादर केला होता त्यातील 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामेही येणाऱ्या काळात पुर्ण होतील. मी चार वर्षात जिल्ह्यात सर्वाधिक निधी आणला आहे. या निधीतून कामे पूर्ण होत आहेत. याचे मला समाधान आहे, असे मत आमदार शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

ते म्हणाले, "" पाटणच्या दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामे 
मंजूर करून आणली. त्यातील काही कामे मंजूर करून आणण्यासाठी कायद्यात बदल करावा लागला.त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदत केली. त्यातुन काही कामांचे भूमिपूजन झाले आहे तर अनेक कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. काही कामांसाठी निधी मिळावा याकरिता शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.'' 

माझ्या कार्यकाळात कोयना भूकंप पुनर्वसन समितीचा पाच कोटीचा निधी दहा कोटी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. 18 कोटी 28 लाख रुपयांचा पर्यटन आराखडा सादर केला. 279 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 117 कोटी रुपये, ग्रामीण अंतर्गत रस्त्यासाठी सात कोटी, जिल्हा अंतर्गत रस्त्यासाठी सहा कोटी, प्रमुख मार्गांसाठी34 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आमदार आदर्श गाव योजनेतून तीन गावांमध्ये पाच कोटी 22लाख रुपयांची कामे सुरू आहेत. वर्ष पाटण तालुक्‍यातील बंद असलेले भूकंपग्रस्त दाखले देण्याचे काम विशेष अध्यादेशाद्वारे सुरू करण्यात आले. या अध्यादेशामुळे पाटण तालुक्‍यातील सुमारे 55 हजार भूकंपग्रस्त कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे असेही ते म्हणाले. 

ओपन डिबेटला केव्हाही तयार 
चार वर्षात जिल्ह्यातील जादा निधी माझ्या विधानसभा मतदार संघात आणला आहे. ते दरम्यान विक्रमसिंह पाटणकर राज्याचे कॅबीनेट मंत्री होते. मी ते आमदार होतो. त्यावेळी कोटींची निधी मी आणला होता. त्यानंतर पाटणकर पुन्हा सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. त्यावेळीही एवढा निधी आला नाही. त्यापेक्षा आधिकचा निधी चार वर्षात आणला आहे. त्या चार वर्षांची तुलनात्मक आकडेवारी समोर ठेवुन ओपन डिबेट करायला मी कधीही तयार आहे, असा टोला आमदार देसाई यांनी पाटणकर यांना यावेळी लगावला 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख