shambhuraje loss wait but icrease in party | Sarkarnama

शंभूराजे देसाईंचे तीन किलो वजन घटले, पण पक्षात वाढले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

ढेबेवाडी (पाटण) : पाटण मतदारसंघ, गृह, अर्थ व नियोजन राज्यमंत्री पद, तसेच वाशिमचे पालकमंत्री पद या जबाबदाऱ्या संभाळतानाच मंत्री, लोकप्रतिनिधी अन्‌ कुटुंबप्रमुख अशा विविध भुमिका पाटणचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई सध्या संभाळत आहेत.

या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना होणाऱ्या धावपळीमुळे गेल्या तीन चार महिन्यात त्यांचे तीन किलो वजन घटले आहे. पण वाशीमसह अन्यत्र सुरू असलेल्या शिवसेना पक्षबांधणीमुळे शिवसेना पक्षप्रमुखांकडे मात्र त्यांचे वजन आणखीच वाढले आहे.

गृह, अर्थ व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई कालरात्री पाटणमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई कारखानास्थळावरील निवासस्थानी मुक्कामी होते. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिकपणे गप्पा मारताना मंत्री, लोकप्रतिनिधी, कुटुंबप्रमुख अशा विविध भूमिका बजावताना होणारी त्यांची धावपळ सहजपणे समोर आली.

गेल्या तीन-चार महिन्यात आपले वजन तीन किलोने घटल्याचे त्यांनी गप्पांच्या ओघात सांगितले खरे, पण वाशीमसह अन्यत्र सुरू असलेल्या मजबूत पक्षबांधणीमुळे शिवसेना पक्षप्रमुखांकडे मात्र, त्यांचे वजन आणखीन वाढल्याचेही चर्चेतून जाणवले.

सध्या विविध खात्याचा डोलारा सांभाळताना तोंडावर आलेल्या अर्थ संकल्पाच्या सादरीकरणाची तयारीही त्यांच्याकडून वेगाने सुरू आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांनी कोटही शिवायला दिल्याचे चर्चेतून पुढे आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख