shambhuraj desai phone cal with cm fadavnis | Sarkarnama

शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला, त्यानंतरच रोहनवर अंत्यसंस्कार झाले! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

कराड/ सातारा : मुख्यमंत्र्यांनी फोनवरून रोहन तोडकर यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाईल, तसेच सरकारी नोकरीत कुटुंबातील एकाला सामावून घेण्याबाबत विचार करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर चाफळमधील तणाव निवळला. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी यसाठीची भूमिका निभावली. 

कराड/ सातारा : मुख्यमंत्र्यांनी फोनवरून रोहन तोडकर यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाईल, तसेच सरकारी नोकरीत कुटुंबातील एकाला सामावून घेण्याबाबत विचार करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर चाफळमधील तणाव निवळला. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी यसाठीची भूमिका निभावली. 

रोहनचा मृत्यू नवी मुंबईतील दंगलीत झाला. त्याचा मृतदेह पाटण तालुक्‍यातील चाफळला आणल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने परिस्थिती तणावपुर्ण बनली होती. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील घटनास्थळी असूनही मार्ग निघत नव्हता. 

आमदार शंभूराज देसाई यांनी मोबाईलवरून मुख्यमंत्र्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण सुरवातीला संपर्क होत नव्हता. मात्र थोड्या वेळाने संपर्क झाला. यावेळी आमदार देसाई यांनी तोडकर कुटुंबियांची मागणी त्यांच्या कानावर घेतली. मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चावेळी झालेल्या दंगलीत मृत झालेल्यांना ज्याप्रमाणे मदत दिली जाते, त्या प्रमाणेच रोहन तोडकर याच्या कुटुंबाला मदत दिली जाईल. तसेच कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घेण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्‍वासन दिले.

त्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तोडकर याच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घेण्याबाबत आपण प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन दिले. समन्वय समितीचे शरद काटकर यांनी सर्वांना समजून सांगितल्यानंतर तोडकर कुटुंबांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो खोणोली येथे नेऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख