चुकलेली युवती शंभूराज देसाईंच्या फोनमुळे तिच्या कुटुंबात सुखरुप

मुंबईहून मिळेल त्या वाहनाने निघालेली एक युवती मुंबईहून सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जाण्याऐवजी चुकून सोलापूरला गेली. तिने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना फोन लावल्यानंतर चक्रे फिरली आणि ती मुलगी अखेर आपल्या कुटुंबात सुखरूप पोहोचली
Shambhuraj Desai Helped Girl to find her home
Shambhuraj Desai Helped Girl to find her home

सातारा : कोरोना आजारापासून सुरक्षा मिळण्याकरीता मुंबई, पुणे शहरातून आपआपल्या गांवी मिळेल त्या वाहनांने पोहचण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत.आपल्या सुरक्षितेकरीता असाच मिळेल त्या वाहनांने घरी पोहचण्याचा प्रयत्न सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील एका २२ वर्षीय मुलीने केला आणि गावी पोहचण्याएैवजी चुकुन ती पोहचली सोलापुर जिल्हयामध्ये.

२१ दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे बंद असल्या मुळे आता घरी पोहचायचे कसे? असा प्रश्न पडलेल्या त्या मुलीने थेट राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनाच फोन लावला आणि आपली हकीकत सांगून मला माझे गांवी नेण्याची व्यवस्था करा अशी विनंती केली. शंभूराज देसाईंनी विलंब न लावता तात्काळ सोलापुर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावला आणि त्या मुलीला तिच्या घरी आणण्याकरीता तिच्या कुटुंबातील व्यक्तीला सोलापुरला पाठवित आहे, तिला सुखरुप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दयावे, असे सुचित केले.

गृहराज्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे तातडीने या हालचाली झाल्याने ती मुलगी एवढया कठीण परिस्थितीत तिच्या लुगडेवाडी ता.पाटण या गांवी तिच्या कुटुंबामध्ये सुखरुप पोहचली आहे. मुंबई येथे नोकरीनिमित्त असणारी सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील लुगडेवाडी येथील एक २२ वर्षीय मुलगी मिळेल त्या वाहनांने लुगडेवाडी या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील गांवाकडे येण्यास निघाली. परंतु घाईगडबडीत मिळेल त्या वाहनात बसल्यामुळे ती गावाकडे पोहचण्याएैवजी ती पोहचली सोलापुर जिल्हयातील सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावात. आता या गावांतून आपल्या गावी कसे पोहचायचे, असा प्रश्न पडलेल्या त्या मुलीस या गावातील ललिता सिताराम होवळ या महिलेने माणुसकीतून तिच्या घरात आसरा दिला. 

ही बाब त्या मुलीने आपल्या कुटुबांला फोनवरुन सांगितली आणि लगेच आपल्याच तालुक्याचे आमदार हे राज्याचे गृहमंत्री आहेत आपल्याला त्यांचा आधार नक्कीच मिळेल म्हणून धाडसाने तिने थेट गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनाच फोन लावला आणि मी या गांवात कशी पोहचले याची हकीकत सांगून मला माझे घरी पोहचविण्याची व्यवस्था करा अशी विनंती केली. गृहराज्यमंत्र्यांनीही तिचा फोन ठेवताच तातडीने सोलापुर जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावला आणि चुकलेली मुलगी सोलापूर जिल्हयातील कोणत्या गांवात कोणाकडे राहिली आहे याची माहिती देत पाटण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे पत्र तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे देवून गाडी पाठवून देत आहे, त्या मुलीस तातडीने तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दयावे, असे सांगितले.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही तात्काळ त्याठिकाणच्या पोलीस निरीक्षकाला त्या मुलीस शोधून काढण्याच्या तसेच तिला तिचे कुटुंबातील व्यक्ती आल्यानंतर ताब्यात देण्याच्या सुचना केल्याने मुलीच्या भावाने तात्काळ सोलापुरातील सांगोला तालुक्यातील गौडवाडी गाव गाठले आणि आपल्या बहिणीला ताब्यात घेत आसरा देणाऱ्या त्या महिलेचे आभार मानले. आपली मुलगी सुखरुप आपल्या घरी पोहचविण्याकरीता तातडीने हालचाली गतीमान करणारे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे त्या संबधित मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी विशेष आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com