विरोधकांना एकही मत न देणारं 'पांढरेपाणी' देसाईंनी घेतलं दत्तक!

shambhuraj desai focus on pandharepani village
shambhuraj desai focus on pandharepani village

पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघाच्या एका टोकावर डोंगरपठारावर वसलेल्या पांढरेपाणी गावाला मुलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्या मिळाव्यात म्हणून आमदार असताना शंभूराज देसाईंनी या गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ता मंजूर करून आणला होता. आता मंत्री झाल्यावर त्यांनी पांढरेपाणी गावच दत्तक घेतले आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शंभूराज देसाईंनी मंजुर केलेल्या पांढरेपाणी (ता.पाटण) येथील गावपोहोच रस्त्याचे भूमिपुजन प्रसंगी त्यांनी ही घोषणा केली. या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. यानिमित्त येथील ग्रामस्थांनी मंत्री देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देऊन सत्कार केला.

यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, नथूराम कुंभार, शिवदौलत बॅंकेचे संचालक दगडू शेळके, भागोजी शेळके उपस्थित होते.

देसाई म्हणाले, पांढरेपाणी गावाने सन 2014 व 2019 च्या विधानसभा निवडणूकीत मला 100 टक्के मतदान करीत गावकऱ्यांनी एकही मत विरोधात जावू दिलेले नाही. गतवेळीही मतदारसंघात मताच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे बक्षिस या गावाने मिळविले आणि यावेळीही तेच बक्षिस मिळविले आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरुन आपण गतवेळेस ग्रामदैवताच्या सभामंडपाचे विकासकाम दिले. गावाला प्रमुखत: रस्त्याच्या कामांची गरज होती. ती गरज आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत हा रस्ता प्रस्तावित करुन पुर्ण करुन घेतली. येणाऱ्या आर्थिक वर्षात उर्वरीत कामांना आवश्‍यक निधी मंजुर करुन देणेकरीता मी कटीबध्द असून मंत्री म्हणून या गावांच्या विकासाकरीता हे गांव मी दत्तक घेत आहे. 

या गावाच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय यंत्रणेकडील आवश्‍यक योजना राबविणेकरीता एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामधील सर्व विविध विकासकामे पुर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे. गावांत कोणती कामे प्राधान्याने करायची याकरीता ग्रामस्थांनी पाच लोकांची कमिटी तयार करावी. कमिटीने ठरवलेली कामे माझ्याकडे प्रस्तावित करावित. या कामांना आवश्‍यक असणारा निधी टप्प्या टप्प्याने देण्यास मी कटीबध्द आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com