कोयना धरणाच्या भिंतीपासून 5 किमी अंतरावर बोटींग

बोटींग करण्याकरीता मान्यता दयावी याकरीता मी स्वत: तत्कालीन गृह राज्यमंत्री दिपक केसरकर व तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हवाई तसेच प्रत्यक्ष जागांची पहाणी केली होती.
shambhuraj desai conduct meeting of koyna boating
shambhuraj desai conduct meeting of koyna boating

सातारा : कोयना धरणात बोटींग सुरु करण्यासंदर्भातील जागांची पहाणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सातारा यांनी संयुक्तपणे करावी आणि तसा अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केल्या.

कोयना धरणात बोटींग सुरु करण्यासंदर्भात मागील आठवडयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक झाली होती या बैठकीमध्ये धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये कोयना धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेण्याकरीता गृह विभागाचा सविस्तर अहवाल प्राप्त होणे गरजेचे असून यासंदर्भात सातारा येथील विश्रामगृहात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस. एल. डोईफोडे, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, वन्यजीवचे विभागाचे प्रभारी उपसंचालक महादेव मोहिते, वन्यजीव कोयना विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांची आदी उपस्थिती होतो.

कोयना धरणात बोटींग सुरु करण्यासंदर्भातील  बैठकीमध्ये  गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी  कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस. एल.डोईफोडे यांच्याकडून  कोयना धरणाच्या जलाशयातील बोटींग करण्याच्या जलक्षेत्र उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली. यामध्ये धरणाच्या भिंतीपासून सुमारे 5 किमी अंतरावर बोटींग करण्याकरीता मान्यता दयावी याकरीता मी स्वत: तत्कालीन गृह राज्यमंत्री दिपक केसरकर व तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हवाई तसेच प्रत्यक्ष जागांची पहाणी केली होती. तसेच यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्याकडे बैठकाही झाल्या होत्या. कोयना धरणामध्ये बोटींग सुरु व्हावे याकरीता मी स्वत: आग्रही आहे. परंतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोटींग करण्याकरीताची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. कोयना धरणामध्ये सुरक्षिततेच्या दृटीने कोणत्या ठिकाणी बोटींग सुरु करण्याकरीता वाव आहे हे पहाण्याकरीता जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा. अधिवेशन काळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उच्चस्तरीय बैठक घेवून या बोटींग सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेता येईल असेही श्री. देसाई यांनी या बैठकीत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com