५४ जण निगेटिव्ह आले, तरीही काळजी घ्या : शंभूराज देसाई

तांबवे (ता.कराड) येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व शासकीय यंत्रणांची कराड विश्रामगृहात बैठक घेऊन आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले
Shambhuraj Desai Appeals People to take Precaution
Shambhuraj Desai Appeals People to take Precaution

सातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे गांवात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.तसेच सर्वांवर भितीची छाया पसरली होती. पण सुदैवाने या बाधिताच्या संपर्कात आलेल्या ५४ संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही प्रशासनाने सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे. जनतेत भितीचे कोणतेही वातावरण राहणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिले आहेत.

तांबवे (ता.कराड) येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांची कराड विश्रामगृहात बैठक घेऊन आढावा घेतला. ते म्हणाले, ''तांबवे गावातील मुंबईतील रहिवाशी एका रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या गावांबरोबर आसपासच्या गांवात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. बाधित व्यक्तीच्या त्याच्या कुटुंबियासह संपर्कात आलेल्या अन्य काहीजणांची आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर संपर्कातील व्यक्ती या कोरोना निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. तालुका प्रशासनाने यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण राहणार नाही. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने नाकाबंदी, जमावबंदी तसेच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जात आहे ही चांगलीच बाब आहे.''

सर्वांच्या सहकार्यातून कोरोनाविरुध्दचा लढा यशस्वी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे, तशीच जनतेनेही स्वत:ची आणि परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, किशोर धुमाळ, उंब्रजचे सहायक पोलिस निरिक्षक अजय गोरड, वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा हुंदरे उपस्थिती होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com