विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीची अवस्था काय होईल, याची काळजी करा!  

सत्यजितसिंहानी सातारा जिल्हयातील त्यांच्या पक्षाची परिस्थिती पहावी.
राष्ट्रवादीची अवस्था काय होईल, याची काळजी करा!
राष्ट्रवादीची अवस्था काय होईल, याची काळजी करा!

सातारा : मी कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार याची सत्यजितसिंह पाटणकरांनी काळजी करू नये. त्यांनी ज्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बांशिग बांधले आहे त्या पक्षाची विधानसभा निवडणुकीपर्यंत काय अवस्था असेल? याची काळजी करावी, असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

आमदार देसाई म्हणाले, सत्यजितसिंह पाटणकरांना मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याची काळजी लागली राहिली आहे. परंतू मला त्यांना सांगावेसे वाटते, मी कोणत्या पक्षातून विधानसभेची निवडणूक लढणार हे पाटण मतदारसंघातील जनतेला चांगलेच माहिती आहे. तुम्ही त्याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार आहात त्या पक्षाची पहिल्यांदा काळजी करा. कारण विधानसभा निवडणुक ही राज्याची आहे आणि सध्या राज्यातील आपल्या पक्षाचे विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार तुमच्या पक्षाला रामराम करुन कोण शिवसेनेत तर कोण भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत. त्यामुळे तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणूकीपर्यंत महाराष्ट्रात काय अवस्था असेल याची भिती तुमच्या पक्षप्रमुखांनाच लागून राहिली आहे. सत्यजितसिंहानी सातारा जिल्हयातील त्यांच्या पक्षाची परिस्थिती पहावी, असा सल्ला आमदार देसाई यांनी दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com