"खरं सांगू का..?, असं रावसाहेब दानवे जेव्हा विचारतात! 

"खरं सांगू का..?, असं रावसाहेब दानवे जेव्हा विचारतात! 

पुणे : मोकळे-ढाकळे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मंगळवारी पत्रकार परिषदेत "खरं बोलणार होते.... पण, पुण्यात आहोत आणि आपले वक्तव्य म्हणजे मोठी बातमी व्हायला नको,' असा विचार करीत त्यांनी स्वतःला सावरले. पण, त्यांना काय म्हणायचे आहे हे मात्र सगळ्यांना समजले आणि अवघड व अनुत्तरीत प्रश्‍नांची उत्तरेही मिळाली... 

पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी बोलण्याच्या ओघात भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बावळट म्हणून ऑगस्ट महिन्यात संभावना केली होती. दानवे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्या वक्तव्याचे पडसाद उमटले. 

"या वक्तव्याची प्रदेश भाजपने काही दखल घेतली का,' अशी पत्रकारांनी दानवे यांना विचारणा केली. त्यावर "हे वक्तव्य मी ऐकले नाही आणि वाचलेही नाही' असे उत्तरे दानवे यांनी दिले. त्यावर हशा पसरला अन्‌ पालकमंत्री गिरीश बापट तुम्हाला शहरातील काही माहिती देत नाहीत का,' असे पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर बापट आणि दानवे दोघांनीही हसून प्रश्‍नाचे उत्तर टाळले. मात्र, टीव्ही चॅनेल, फेसबुक, व्हॉटस ऍप आदी माध्यमांवरही सहयोगी खासदारांचे वक्तव्य प्रसिद्ध झाले ते समजले नाही का असाही प्रश्‍न दानवे यांना विचारण्यात आला. 

पक्ष किंवा त्यातील लोकप्रतिनिधींबद्दल शेरेबाजी करू नये, अशी किमान समज तरी पक्षाने खासदार काकडे यांना दिली का, असे विचारले असता, दानवे यांचा धरून ठेवलेला पेशन्स संपला... "अन्‌ आता मी खरं बोलू का' असे त्यांनी म्हटले. त्यामुळे पत्रकारांचे कान टवकरले गेले. परंतु, क्षणभर पसरलेल्या शांततेचे गांभीर्य लक्षात आल्यावर दानवे यांनी विषयला बगला दिली आणि हसतमुख चेहरा दुसऱ्या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी सज्ज केला. 

पत्रकार परिषदेनंतरही संजय काकडे यांच्याबाबत दानवे यांनी बाळगलेले बोलके मौन हा उपस्थित नेत्यांत चर्चेचा विषय झाला होता तर, महापालिकेचे आणि शहरातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे चेहरे खुलले होते ! 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com